भाजपच्या विरोधात लढण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांचे ऐक्य घडविण्याचा प्रयत्न झाला. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपात सहमती घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्याचीच री पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ओढल्याने विरोधकांच्या ऐक्याला तडा गेला आहे. ममतांच्या निर्णयाने इंडिया आघाडीच्या विरोधात वातावरणनिर्मितीला मदतच होणार आहे.

इंडिया आघाडीची स्थापना झाली तेव्हाच विरोधकांचे कितपत ऐक्य होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पाटणा, बंगळुरू, मुंबईतील बैठकांमध्ये भाजपच्या विरोधात लढण्यासाठी सहमती घडवून आणण्यात आली. सप्टेंबरच्या सुरुवातीला मुंबईत झालेल्या बैठकीत जागावाटपाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा निर्णय झाला होता. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीतच शक्य असेल तेथेच एकत्र निवडणूक लढण्याचा ठराव करण्यात आला होता. ‘शक्य असेल’ हा शब्दप्रयोग करण्यात आल्याने भाजपच्या विरोधात देशभर एकास एक उमेदवार उभा करण्याची शक्यता मावळली होती.

Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

हेही वाचा : “आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार”, ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा; म्हणाल्या, “आम्ही काँग्रेसला…”

पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये इंडिया आघाडीत सहमती होण्याची शक्यता कमीच होती. ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांनी आघाडी करण्याची शक्यता फेटाळून लावली होती. केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेसने हातमिळवणी करण्यास ठाम नकार दिला होता. पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये एकमत होणे कठीणच आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी ही घोषणा अनपेक्षित नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता, डावे आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकत्र येणे शक्यच नव्हते. केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र लढल्यास भाजपला संधी मिळू शकते. यामुळेच डावे पक्ष आणि काँग्रेसने आधीच इंडिया आघाडीचे घटक पक्ष असले तरी एकत्रित लढणार नसल्याचे जाहीर केले होते.

हेही वाचा : ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आसाममध्ये भाजपाशी संघर्ष; ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांचे मात्र मौन, नेमकं कारण काय?

भाजपच्या विरोधात लढण्याकरिता इंडिया आघाडीला बळ देण्याचा प्रयत्न सुरू होता. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनीच मांडला होता. यापैकी ममतांनी स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले. आप आणि काँग्रेसमध्ये सहमती होण्याची शक्यता कमीच आहे. ममतांच्या निर्णयाने इंडिया आघाडीच्या ऐक्याला मात्र तडा गेला आहे. ममतांच्या ‘एकला चलो रे’ या घोषणेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनीही काँग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्यता फेटाळून लावली. इंडिया आघाडीत २८ पक्षांचा समावेश होता. ममता आणि मान यांच्यापाठोपाठ आणखी काही पक्ष वेगळी भूमिका मांडू शकतात. या साऱ्यांचा इंडिया आघाडीच्या ऐक्यावर परिणाम होणार आहे. विरोधी मतांमध्ये होणारे विभाजन शेवटी भाजपच्याच पथ्थ्यावर पडणार आहे.

Story img Loader