UP Assembly Bypolls Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याबरोबरच शनिवारी भाजपासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने लढवलेल्या पोटनिवडणुकीमध्ये लढवलेल्या सातपैकी सहा जागा जिंकल्या आहेत. इतकेच नाही तर समाजवादी पक्षाच्या दोन जागादेखील खेचून आणण्यात पक्षाला यश आले आहे. विशेष बाब म्हणजे या दोन जागा जवळपास तीन दशकांपासून भाजपाला जिंकता आल्या नव्हत्या.

या निकालानंतर लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे. एकंदरीत भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला या पोटनिवडणुकीत एकूण नऊ जागांपैकी सात जागांवर विजय मिळाला आहे. तर दोन जागांवर समाजवादी पक्ष विजयी झाला आहे.

Maharashtra Assembly Election Results, Sakoli Constituency, Nana Patole Victory, Nana Patole latest news,
नाना पटोलेंच्या भ्रमाचा भोपळा फुटला; साकोलीत लाजिरवाणा विजय!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shambhuraj desai devendra fadnavis
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेची माघार नाही? शंभूराज देसाई म्हणाले, “आम्ही फडणवीसांना सांगितलंय…”
Eknath Shinde, Eknath Shinde withdrawal from the post of Chief Minister, Shivsena Activist, Eknath Shinde Resignation,
Eknath Shinde Resignation : मुख्यमंत्रीपदावरून शिंदे यांची माघार? शिवसेनेचा आक्रमकपणा मावळला
Warora Constituency, Karan Devtale, Pravin Kakade,
देवतळे कुटुंबाची धानोरकर कुटुंबावर मात; ७० वर्षांनंतर वरोऱ्यात कमळ फुलले
Amol Mitkari ajit pawar naresh arora news
अजित पवारांचा ‘तो’ फोटो पाहून मिटकरींचा संताप, पक्षाने एकटं पाडलं; मिटकरी थेट भिडले; राष्ट्रवादीत चाललंय काय?
EKNATH SHINDE cm
Raosaheb Danave : अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदेंना शब्द? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले…

अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या जास्त असलेल्या कुंदरकी येथे समाजवादी पक्षाच्या झिया-उल-रेहमान बर्क यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ही जागा सोडली होती. येथे समाजवादी पक्षाचेच मोहम्मद रिझवान यांचा भाजपाचे उमेदवार रामवीर सिंह यांनी १.४४ लाख मतांनी पराभव केला. गेल्या २८ वर्षांच्या काळात ही जागा समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्ष (BSP) जिंकत आला होता. यंदा या मतदारसंघातून पहिल्यांदाच अल्पसंख्याक समाजाचा आमदार निवडून आला नाही.

या निवडणुकीत समाजवादी पक्षाने त्यांचा प्रचार पीडीए म्हणजेच पीछडा (मगास समाज किंवा ओबीसी), दलित आणि अल्पसंख्यांक या सुत्रावर केंद्रीत केला होता, मात्र त्यांना मतदारांना आपल्याकडे खेचता आले नाही.

कुठे कोण जिंकलं?

आंबेडकरनगर जिल्ह्यातील कटेहरी या भागात ओबीसी आणि दित समाजाचे वर्चस्व पाहायला मिळते. येथे भाजपच्या धर्मराज निषाद यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवार शोभावती वर्मा यांचा ३४,५१४ मतांनी पराभव केला. ही जागा २०२० मध्ये समाजवादी पक्षाचे लालजी वर्मा यांनी जिंकली होती पण ते लोकसभेसाठी निवडून गेल्यानंतर ती रिक्त झाली होती. कुंदरकीप्रमाणेच कटेहरी येथेदेखील तीन दशकांनंतर मिळालेला विजय भाजपासाठी महत्त्वाचा आहे. कारण भाजापाने शेवटचा १९९१ मध्ये हा मतदारसंघ जिंकला होता.

कुंदरकी आणि कटेहरी याबरोबरच भाजपाने गाझियाबाद, खैर,मांझवा आणि फुलपूर या जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाचे संजीव वर्मा हे गाझियबादमध्ये समाजवादी पक्षाचे राजसिंह जाटव यांच्याविरोधात उभे होते. त्यांनी ही जागा ६९,००० मतांनी जिंकली. खैरमध्ये भाजपाचे सुरेंदर दिलर यांनी चारू केन या समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा ३८,३९३ मतांनी पराभव केला. तर फुलपूर येथे भाजपाचे दीपक पटेल यांनी मोहम्‍मद मुजतबा सिद्दीकी या समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा ११,३०५ मतांनी पराभव केला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत निषाद पार्टी भाजपाच्या मित्रपक्षाने जिंकलेल्या मांझवामध्ये पक्षाच्या शुचिस्मिता मौर्य यांनी समाजवादी पक्षाच्या ज्योती बिंद यांचा ४,९२२ मतांनी पराभव केला.

हेही वाचा>> Donald Trump : भारतासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची Good News; ‘त्या’ यादीतून भारताला वगळले

समाजवादी पक्षाला दोन जागा

करहल आणि सीसामऊ या दोन जागा आपल्याकडे राखण्यात समाजवीदी पक्षाला यश आले आहे . ज्यापैकी करहलमध्ये यादव विरुद्ध यादव अशी लढत होती. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कन्नौजमधून लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर करहलची जागा सोडली होती. त्यानंतर समाजवादी पक्षाने करहलमध्ये अखिलेश यादव यांचे पुतणे तेज प्रताप सिंह यादव यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाने अनुजेश यादव यांना उमेदवारी दिली, जे समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे धाकटे भाऊ अभय राम यादव यांचे जावई आहेत. या मतदारसंघात तेज प्रताप यांनी १४,७२५ मतांनी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला राखला.

सीसामऊ ही जागा समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार इरफान सोलंकी यांना गुन्हेगारी खटल्यात दोषी ठरवल्यानंतर रिक्त झाली होती. येथे सोलंकी यांच्या पत्नी आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवार नसीम सोलंकी यांनी भाजपाचे सुरेश अवस्थी यांचा ८,५६४ मतांनी पराभव केला. तर एनडीएचा भाग असलेल्या केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाने मीरपूरची जागा जिंकली. येथे मिथीलेश पाल यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार सुंबूल राणा यांचा ३०,००० मतांनी पराभव केला.

आदित्यनाथनंतर योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठ झटका बसला होता. यानंतर भारतीय जनता पक्षासाठी तसेच योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ही पोटनिवडणूक नवी उभारी देणारी ठरली आहे. एनडीएला या पोटनिवडणुकीत मिळालेला विजय हा पक्षाला प्रोत्साहन देणारा ठरला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतील हा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या विजयाचे श्रेय हे पंतप्रधान मोदी यांना दिले आहे. “उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा-एनडीएला मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टीवरील असलेल्या लोकांच्या अढळ विश्वासाचा पुरावा आहे”, अशी पोस्ट त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.

“हा विजय डबल इंजिन सरकारच्या सुरक्षा, सुशासन आणि लोकांच्या कल्याणाबद्दल असलेल्या वचनबद्धतेचा याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे”, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.