काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावावरील भाष्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ओबीसी समजाचा अपमान केला, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. असे असतानाच उत्तर प्रदेश भाजपामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.४५ सदस्यीय राज्य पदाधिकाऱ्यांपैकी एकूण १३ ओबीसी नेत्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान दिले आहे.
हेही वाचा >>> कर्नाटकमधील मुस्लिमांचे आरक्षण रद्द, अमित शाहांकडून निर्णयाचे स्वागत, म्हणाले “काँग्रेसकडून…”
उत्तर प्रदेश कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल
भाजपाने आपल्या उत्तर प्रदेश कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. भाजपा उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष भूपेंद्रसिंग चौधरी यांनी आठ अनुसूचित जाती, १२ ओबीसी, ९ ब्राह्मण, ७ ठाकूर तर सात उच्च जातीय नेत्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान दिले आहे. आपल्या ४५ सदस्यीय कार्यकारिणीमध्ये चौधरी यांनी कार्यकारिणीवर ३२ नेत्यांना कायम ठेवले आहे.
हेही वाचा >>> मालेगावात मुस्लीम समुदायाबरोबर जोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न
प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न
आपल्या कार्यकारिणीत चौधरी यांनी प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेश पश्चिममधून १३, पूर्व उत्तर प्रदेशमधून १२, मध्ये उत्तर प्रदेशमधून १० नेत्यांचा राज्य कार्यकारिणीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लखनौमधील सर्वाधिक ६ तर कानपूरमधून ५, आग्रा आणि वाराणसी येथून प्रत्येकी तीन नेत्यांचा राज्य कार्यकारिणीमध्ये समावेश केला आहे.
हेही वाचा >>> सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला टोचले आणि भाजपला दिले प्रत्युत्तर
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता उत्तर प्रदेश भाजपाने वरील बदल केले आहेत. या बदलाचा लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.