UP Bypoll Election 2024 BJP vs SP : उतर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागा रिक्त आहेत. निवडणूक आयोग लवकरच या जागांवर पोटनिवडणूक घेणार आहे. अशातच पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच विविध पक्षांनी या मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी चालू केली आहे. मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात यावेळी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. भाजपा आणि समाजवादी पार्टीने ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, त्यामुळे ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी मिल्कीपूरमध्ये भाजपा उमेदवार व माजी आमदार बाबा गोरखनाथ यांचा १३ हजार मतांनी पराभव करत ही निवडणूक जिंकली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने अवधेश प्रसाद यांना फैजाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. राम मंदिर व अयोध्या शहर याच मतदारसंघात आहे. अवधेश प्रसाद हे लोकसभा निवडणूक जिंकत संसदेत गेले आहेत, त्यामुळे त्यांनी मिल्कीपूर विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर ही जागा समाजवादी पार्टीकडून परत मिळवण्यासाठी भाजपा प्रयत्नांची पराकाष्टा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

समाजवादी पार्टी व भाजपा या दोन्ही पक्षांनी अद्याप या मतदारसंघातील त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, अवधेश प्रसाद हे त्यांचे पूत्र अजित प्रसाद यांना मिल्कीपूरमधून विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. पक्षातील इतर नेतेही अजित प्रसाद यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल आहेत. मात्र, त्यांच्या वाटेत एक अडथळादेखील आहे. रवी कुमार तिवारी यांच्यावर प्राणघातक हल्ला व अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अजित प्रसाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवारी हे ब्राह्मण असल्यामुळे अजित प्रसाद यांचे विरोधक मतदारसंघातील ब्राह्मण समाजात त्यांच्याविरोधात प्रचार करत आहेत. या प्रकरणामुळे प्रसाद कुटुंबासाठी येथील जातीय समीकरणं बदलली आहेत.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
Eknath shinde appreciated mla Sanjay Gaikwad
मुख्यमंत्र्यांकडून गायकवाड यांचे कौतुक, उपमुख्यमंत्र्यांचे खडेबोल
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
akola district, Mahayuti, Balapur assembly Constituency
महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघ कळीचा मुद्दा
Ulhas bapat modi cji meeting
PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम
Savitri Jindal
Savitri Jindal : भारतातील सर्वांत श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचं भाजपाच्या विरोधात बंड; अपक्ष निवडणूक लढवणार!
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी

हे ही वाचा >> हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?

सपाचे खासदार निवडून आल्यापासून मतदारसंघात गुंडगिरी वाढली : भाजपा

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, फैजाबादचे खासदार व अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय अवधेश प्रसाद यांच्या मुलाने रवी तिवारींचं अपहरण करून त्यांना मारहाण केली होती. लोकसभेत सपाचा उमेदवार जिंकल्यानंतर मतदारसंघात बलात्कार व गुंडगिरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हे ही वाचा >> Amit Shah: अमित शाह यांचा बैठकांचा सपाटा; देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, गडकरींची अनुपस्थिती, मराठा आंदोलनाच्या प्रश्नांवर काय म्हणाले?

भाजपाकडून खालच्या स्तरावरील राजकारण; सपाचा आरोप

दुसऱ्या बाजूला सपाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “भाजपा लोकसभेतील पराभवानंतर सूडाचं राजकारण करू लागली आहे. लोकसभेतील अपयशामुळे आलेली निराशा आणि मिल्कीपूरची जागा गमावण्याच्या भीतीने भाजपा खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करू लागली आहे. योगी आदित्यनाथ हे सातत्याने मिल्कीपूरला येत आहेत. कारण त्यांचा पक्ष आतून खचून गेला आहे. अजित प्रसाद मिल्कीपूर विधानसभेची निवडणूक जिंकू शकतात, त्यामुळेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणे, सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावणे, ईडीचा गैरवापर करण्यास सुरुवात झाली आहे”, असं सपाचे प्रवक्ते व अयोध्येचे आमदार पवन पांडे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा >> पाच कोटींची जमीन दीड कोटीत बहाल; बावनकुळे यांच्याशी संबंधित संस्थेच्या भूखंड वाटपात निकषबदल

खासदार अवधेश प्रसाद यांच्या पुत्राला उमेदवारी मिळणार?

अवधेश प्रसाद यांनी १ ऑक्टोबर रोजी वंचितांवरील सत्ताधाऱ्यांच्या (भाजपा) अन्यायाविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. आंदोलनाची घोषणा करणाऱ्या प्रसाद यांना त्यांच्या मुलाविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. दरम्यान, समाजवादी पार्टीने मिल्कीपूर विधानसभेचे उमेदवार म्हणून अद्याप अजित प्रसाद यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र, अवधेश प्रसाद यांनी म्हटलं आहे की, सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून मिल्कीपूरमधून अजित प्रसाद यांच्या उमेदवारीला मंजुरी दिली होती. दुसऱ्या बाजूला, स्थानिक सपा नेत्याने म्हटलं आहे की, अजित प्रसाद यांना २०१७ च्या निवडणुकीत पक्ष अमेठीमधील जगदीशपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार होता, परंतु आघाडीमध्ये ती जागा काँग्रेसला सुटल्याने त्यावेळी अजित यांची विधानसभेतील पदार्पणाची संधी हुकली. मात्र, आता त्यांना उमेदवारी मिळू शकते.