UP Bypoll Election 2024 BJP vs SP : उतर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागा रिक्त आहेत. निवडणूक आयोग लवकरच या जागांवर पोटनिवडणूक घेणार आहे. अशातच पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच विविध पक्षांनी या मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी चालू केली आहे. मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात यावेळी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. भाजपा आणि समाजवादी पार्टीने ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, त्यामुळे ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी मिल्कीपूरमध्ये भाजपा उमेदवार व माजी आमदार बाबा गोरखनाथ यांचा १३ हजार मतांनी पराभव करत ही निवडणूक जिंकली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने अवधेश प्रसाद यांना फैजाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. राम मंदिर व अयोध्या शहर याच मतदारसंघात आहे. अवधेश प्रसाद हे लोकसभा निवडणूक जिंकत संसदेत गेले आहेत, त्यामुळे त्यांनी मिल्कीपूर विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर ही जागा समाजवादी पार्टीकडून परत मिळवण्यासाठी भाजपा प्रयत्नांची पराकाष्टा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा