येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. दरम्यान, भाजपाकडून या कार्यक्रमाचा जोरदार प्रचार केला जातोय. हा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन भाजपाकडून केला जातेय. तर या कार्यक्रमाचा भाजपाकडून मतासाठी वापर केला जातोय, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. असे असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण आदरपूर्वक नाकारले आहे. असे असतानाच आता उत्तर प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री यांनी मात्र मी २२ तारखेचे निमंत्रण स्वीकारलेले असून त्या सोहळ्याला मी जाणार आहे, असे स्पष्ट केले.

खरगे, सोनिया गांधी यांनी आमंत्रण नाकारले

काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेसंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यातीलच एक निर्मल खत्री यांनी मी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात जाणार आहे, असे स्पष्ट केले.

Amol Khatal Sangamner, Amol Khatal of Shivsena,
अहमदनगर : संगमनेरमधून माजी मंत्री आमदार थोरात यांच्या विरोधात शिवसेनेचे अमोल खताळ
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
congress candidate sajid khan in akola west constituency for Assembly Election 2024
अकोला : काँग्रेसने साजिद खान यांच्यावरच दाखवला विश्वास, नाराज नेत्याने धरली ‘वंचित’ची वाट
Dr. Nitin Raut, Dr. Milind Mane
उत्तर नागपूरमध्ये तिसऱ्यांदा राऊत- माने लढत
Anees Ahmed Congress, Anees Ahmed, Congress,
काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा बंडाचा झेंडा? पक्षाच्या जातीय गणितावर थेट टीका, म्हणाले…
Anil Deshmukh, Anil Deshmukh news, Anil Deshmukh latest news,
देशमुखांची बदलेली भूमिका गृहकलह की राजकीय खेळी ?
mla Manohar chandrikapure
गोंदिया: राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली, ‘या’ विद्यमान आमदारांचा थेट तिसऱ्या आघाडीत प्रवेश
Nationalist Ajit Pawar Group MLA Yashwant Mane
यशवंत माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण? मोहोळमध्ये आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी

काँग्रेसच्या नेत्यांनी घेतले प्रभू रामाचे दर्शन

दुसरीकडे उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी (१५ जानेवारी) मकर संक्रांतीच्या निमित्ताने अयोध्येत जाऊन शरयू नदीत स्नान केले. तसेच हनुमानगढी आणि तात्पुरते उभारण्यात आलेल्या राम मंदिराला भेट देत प्रभू रामाचे दर्शन घेतले. याच कारणामुळे मीदेखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारले आहे, असे खत्री यांनी सांगितले.

“…म्हणून कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले”

“रामाची भक्ती करण्यात काहीही गैर नाही. रामभक्तांपैकीच एक असल्याचा मला अभिमान आहे,” असे समाजमाध्यमावर पोस्टच्या माध्यमातून खत्री म्हणाले. खत्री हे २०१२ ते २०१६ सालापर्यंत उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. “काँग्रेसच्या सदस्यांनी या कार्यक्रमाला जायचे की नाही, याबाबत संघटनेकडून काहीही निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मी त्या सोहळ्यात सहभागी होणार आहे. मी त्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारलेले आहे,” असे खत्री यांनी सांगितले.

“विचारांची लढाई विचारानेच लढावी लागेल”

“हाडाचा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून संघाच्या विचारधारेशी लढा द्यायचा असेल तर तो विचारांनीच द्यावा लागेल, असे मला वाटते. आपल्याला आपली विचाधारा आणखी बळकट करावी लागेल. तसेच स्थानिक पातळीवर संघटनेला बळ द्यावे लागेल. याच माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे,” असे मतही खत्री यांनी व्यक्त केले.

निर्मल खत्री यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचे कौतुक केले.