आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बराच कालावधी बाकी असला तरी सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपानेदेखील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेशमध्येही हालचाली वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी येथे योगी सरकारकडून ‘परशुराम सर्किट’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याप्रकल्पांतर्गत येथे भगवान परशुराम यांच्या जन्मस्थळासह अन्य धार्मिक स्थळांचा विकास करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> सुधारीत मतदार यादी स्वीकारली जाणार नाही, जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल

उत्तर प्रदेशमधील जलालाबाद हे भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ मानले जाते. याच जन्मस्थळाचा विकास करण्याचे योगी सरकारने ठरवले आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयातर्फे मंत्री जितीन प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून परशुराम यांच्या जन्मस्थळाचा विकास केला जाणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये सरकारतर्फे भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. परशुराम यांच्या जन्मस्थळासोबतच ‘परशुराम सर्किट’च्या माध्यमातून एकूण पाच धार्मिक स्थळांचा विकास केला जाणार आहे. परशुराम यांचे जन्मस्थळ तसेच अन्य पाच धार्मिक पर्यटनस्थळांचा विकास करून भाजपातर्फे ठाकुर समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला जातोय.

हेही वाचा >>> दुरदर्शन अँकर, टिकटॉक स्टार ते राजकीय नेत्या; कोण होत्या सोनाली फोगट ज्यांच्यावर भाजपाने दिली होती मोठी जबाबदारी

परशुराम सर्किट प्रकल्पात कोणत्या स्थळांचा विकास केला जाणार?

जलालाबाद येथील भगवान परशुराम यांच्या जन्मस्थळासोबतच ‘परशुराम सर्किट’ प्रकल्पात पाच धार्मिक स्थळांचा विकास केला जाणार आहे. त्याची सुरुवात जलालाबादपासून केली जाणार आहे. तसेच सीतापूरमधील नैमिसारण्य ,सीतापूरमधील महर्षी दधीची आश्रम, लखीमपूर खेरी येथील गोला गोकरनाथ आणि पिलभित येथील गोमती घाट या पाच धार्मिक स्थळांचाही विकास करण्यात येणार आहे. या ठिकाणांवर पोहोचण्यासाठी प्रशस्त रस्त्यांसह वेगवेगळ्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा >>> तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे दिल्लीतील अबकारी कर धोरण गैरव्यवहारात नाव, भाजपाने केला गंभीर आरोप

या प्रकल्पांसाठी उत्तर प्रदेश सरकार केंद्र सरकारचीदेखील मदत घेणार असल्याचे सांगिले जात आहे. परशुराम सर्किटमध्ये उत्तराखंडमधील पुर्णागिरी तसेच नीम करोली बाबा धाम यांचादेखील समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. भाजपासोबतच बहुजन समाज पार्टी तसेच समाजवादी पार्टीनेदेखील ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. आमची सत्ता आली तर भगवान परशुराम यांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, असे आश्वासन बसपाने दिलेले आहे. तर सत्तेत आल्या आम्ही परशुराम यांच्या जयंतीदिनी सार्वजिनक सुट्टी घोषित करू, असे आश्वासन समाजवादी पार्टीने दिलेले आहे.

हेही वाचा >>> माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ‘झाडू’ हाती घेतला,’आप’ मधील प्रवेशाने यवतमाळात बदलाचे वारे

दरम्यान, भाजपाच्या या मोहिमेविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांनी अधिक माहिती दिली आहे. तसेच त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलंय. “विरोधकांनी निवडणुकीसाठी भगवान परशुराम यांचा वापर केला. त्यानंतर ते भगवान परशुराम यांना विसरून गेले. आता तर ते याविषयी बोलतही नाहीत. भाजपाकडून परशुराम यांचे जन्मस्थळच नव्हे तर परशुराम सर्किटच्या माध्यमातून अन्य धार्मिक स्थळांचाही विकास केला जाईल,” असे प्रसाद यांनी सांगितले.

Story img Loader