राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे इंडिया आघाडीचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस यासारखे पक्ष काँग्रेसचे वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडिया आघाडीत अद्याप जागावाटप व्हायचे आहे. असे असतानाच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या युतीसंदर्भात वेगवगळ्या भूमिका घेतल्या आहेत.

युती करण्यासंदर्भात वेगवेगळी मतं

आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांशी युती करण्यासंदर्भात उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये वेगवेगळे मतं निर्माण झाली आहेत. काही नेते इतर प्रादेशिक पक्षांशी युती करण्याच्या भूमिकेत आहेत. तर कोणाहीशी युती न करता काँग्रेसने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी, अशी भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे. काही नेत्यांनी तर बहुजन समाज पार्टीशी युती करणे योग्य राहील, असे मत मांडले.

महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?

उत्तर प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने नुकतेच आपल्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केलेली आहे. या नव्या कार्यकारिणीची मंगळवारी (५ डिसेंबर) एक बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचारविनिमय झाला. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत जागावाटपात योग्य जागा मिळाल्या तरच युती करावी, असा सूर काही नेत्यांचा होता. तर काही नेत्यांनी ही निवडणूक राज्य पातळीवरची नसून देशपातळीवरची आहे. त्यामुळे ती एकट्यानेच लढणे योग्य राहील, अशी भूमिका मांडली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने येथे काँग्रेस पक्ष कामाला लागला आहे. पक्षाने येथे परिवर्तन यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेची सुरुवात सहारनपूरच्या शाकंबरी माता मंदिरापासून झाली आहे. तर या यात्रेचा शेवट सीतापूर जिल्ह्यात होणार आहे.

“युती करायला हरकत नाही, पण…”

या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत काँग्रेसच्या एका नेत्याने अधिक माहिती दिली. “या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या युतीवर चर्चा झाली. अन्य पक्षांशी युती करायला हरकत नाही. फक्त जागावाटपादरम्यान समाधानकारक जागा मिळायला हव्यात, अशी भूमिका तरुण नेत्यांनी घेतली. तर २००९ साली काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाला होता. त्यामुळे यावेळीही स्वतंत्रपणे निवडणूक लढणे योग्य राहील, असे काही नेत्यांचे मत होते,” अशी माहिती या नेत्याने दिली.

“बसपाशी युती केली तर…”

काही नेत्यांनी बहुजन समाज पार्टीशी (बसपा) युती करणे फायदेशीर राहील, असेही मत मांडले. “बसपाशी युती केल्यास पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला फायदा होईल, असे मत काही नेत्यांनी मांडले. मात्र शेवटी या युतीसंदर्भात वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील असे ठरवण्यात आले. तसेच स्थानिक पातळीपर्यंत पक्ष कसा पोहोचेल यावर लक्ष केंद्रीत करण्यावर एकमत झाले,” असेही या नेत्याने सांगितले.

“आता लोकसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत करा”

दरम्यान, उत्तर प्रदेश कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी अन्य नेत्यांना मार्गदर्शन केले. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत निकाल काहीही येऊ देत. पण तुम्ही खचून जाऊ नका. आता आपण आपले लक्ष लोकसभा निवडणुकीकडे केंद्रीत केले पाहिजे, असे अजय राय कार्यकारिणीतील सदस्यांना उद्देशून म्हणाले.

Story img Loader