राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेवरून सध्या राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. विरोधक भाजपावर राम मंदिर सोहळ्याला राजकीय कार्यक्रम बनवला असल्याचा आरोप करत आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट सर्व राजकारण्यांनादेखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देत आहे. परंतु, अनेक विरोधकांनी हे निमंत्रण अस्वीकार केले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेबद्दल आणि भाजपाच्या भूमिकेबद्दल उत्तर प्रदेशमधील नागरिक काय विचार करतात? जाणून घेऊ…

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील कुरवली हे एक छोटे शहर आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त संपूर्ण बाजारपेठ दिव्यांनी आणि श्रीराम ध्वजांनी सजली आहे. सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. शहरालगतच्या अशोकपूर गावातील २८ वर्षीय रहिवासी अजयपाल सिंहही अतिशय आनंदात आहे.

shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!
Sharad Pawar Speaking At Markadwadi.
Sharad Pawar : मी काय चुकीचं केलं? मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…
Sharad Pawar On Rohit Pawar Rohit Patil
Sharad Pawar : रोहित पवारांना डावलून रोहित पाटील यांना प्रतोद का केलं? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण
Yogi Adityanath on Bangladesh
Yogi Adityanath: “बाबरनं ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत जे केलं, तेच आज बांगलादेशात होतंय”, थेट DNA चा उल्लेख करत योगी आदित्यनाथांची टीका

सिंह म्हणतात, “लोकांची श्रद्धा रामाशी शतकानुशतके जोडलेली आहे आणि २२ जानेवारीला त्यांची अनेक दशकांची तपस्या पूर्ण होणार आहे. आमच्यासाठी योगी-मोदींच्या नेतृत्वात हे रामराज्यच आहे. २२ जानेवारीनंतर सर्व देवी-देवता पृथ्वीवर अवतरतील, ही आमची श्रद्धा आहे.”

सिंह आणि त्यांचे मित्र लोधी राजपूत (ओबीसी) आहेत. भाजपाच्या काळात मशीद पाडली गेली आणि भाजपाच्या राज्यातच मंदिरही तयार होत असल्याचा आनंद त्यांनी दर्शवला.

मध्य यूपीमधील मैनपुरी-इटावा पट्टा हा समाजवादी पक्षाचा (एसपी) बालेकिल्ला आहे. इथे दिवंगत संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निवासस्थानही आहे. यादवांचे वर्चस्व असलेले क्षेत्र म्हणून मैनपुरी आणि इटावा ओळखले जाते. मुलायम सिंह यांची सून डिंपल यादव सध्या मैनपुरीच्या खासदार आहेत.

मैनपुरी आणि इटावा जिल्ह्यांमध्ये लोधी राजपूत आणि शाक्य-कुशवाहांची लोकसंख्या मोठी आहे. लोधी राजपूत आणि शाक्य-कुशवाहा हे फार पूर्वीपासून भाजपाचे पारंपरिक मतदार होते. यामुळे मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपालाही त्यांचे पूर्ण समर्थन आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात भाजपा राम मंदिरामुळे मंदिराचा पक्ष म्हणून ओळखला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंह यांनीच मुख्यमंत्री असताना ३० ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर १९९० रोजी राम जन्मभूमीच्या दिशेने येणाऱ्या कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये २० हून अधिक कारसेवक मारले गेले होते.

प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख असलेले दिवंगत भाजपा नेते कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सरकारच्या काळात बाबरी मशीद पाडण्यात आली. जनतेने हा काळ आणि संघर्ष कधीही विसरू नये, अशी भाजपाची इच्छा आहे. परंतु, या घटनेच्या ३० वर्षांनंतर नवीन पिढीच्या हातात सर्व कारभार आला; यामुळे इतिहासातील या घटना पूसट होत गेल्या.

हेही वाचा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, “भाजपाने मला दोनदा संपर्क साधला अन्… “

मंदिराच्या उद्घाटनाबद्दल खासदार डिंपल म्हणाल्या, “आमंत्रण दिले तर आम्ही जाऊ.” मला अद्याप कोणतेही निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगत, येत्या काही दिवसांत माझे संपूर्ण कुटुंब अयोध्येला जाणार हे तुम्हाला दिसेल, असे डिंपल यांनी स्पष्ट केले. पती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही जाहीर केले की, मंदिर तयार होत असल्याचा त्यांना खूप आनंद आहे, ते नंतर मंदिराला भेट देतील.

Story img Loader