उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी काही काळासाठी राजकीय विश्रांती घेतली होती. या विरामानंतर आता समाजवादी पक्ष (एसपी) आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) हे दोन प्रमुख विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. या दोन्ही पक्षांनी राज्याच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. असं असूनही काँग्रेस मात्र उत्तर प्रदेशात अजूनही शांत असल्याचे पहायला मिळत आहे. अजूनही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. माजी आमदार अजय कुमार लल्लू यांनी मार्चमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर यूपी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेवसला फक्त २.३३ टक्के मते मिळवता आली होती. देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या राजकीय पक्षाची आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी होती.
उत्तर प्रदेशमध्ये अजूनही काँग्रेसचा दारुण पराभवाला तीन महिने झाले तरी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला नेतृत्व नाही
विरामानंतर आता समाजवादी पक्ष (एसपी) आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) हे दोन प्रमुख विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-07-2022 at 16:40 IST
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Utter pradesh congress is still waiting for appoinment of state president pkd