मुंबई : युती करण्यासंदर्भात भारत राष्ट्र समितीकडून प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू,असे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले आहे. यावर भारत राष्ट्र समितीने युतीचा प्रस्ताव ठेवत वंचितबरोबर मैत्रिचा हात पुढे केला तर प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर केलेली युती तोडणार का, याकडे लक्ष वेधले जात आहे. वंचितने आगामी काळात अशाप्रकारची भूमिका घेतली तर २०१९ प्रमाणे इंडिया अथवा महाविकास आघाडीचे गणीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिघडणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एमआयएम’ पक्षाशी युती करून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीचे गणीत बिघडवले होते. लोकसभा निवडणुकीत १४ टक्यांच्या आसपास मते घेतली होती. तर वंचितने २०१९ मध्ये आघाडीच्या जवळजवळ १५ उमेदवारांना पराभूत करण्यात हातभार लावला होता. सुमारे ५० हजार ते ३ लाख यादरम्यान मते घेऊन वंचितने आघाडीच्या उमेदवारांचे गणीत बिघडवले होते.

Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express
ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
ballarpur assembly, abhilasha gavture, sudhir mungantiwar, santosh singh ravat,
गावतुरे यांच्या बंडखोरीने बल्लारपूरमध्ये काँग्रेस अडचणीत
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट

हेही वाचा – शेकापसमोर अस्तित्वाचा प्रश्न, पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित-एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलिल यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. तर नांदेड, परभणी, सांगली, अकोला, हिंगोली, बुलढाणा, सोलापूर, हातकणंगले, लातूर, गडचिरोली-चिमूर, नाशिक, उस्मानाबाद, यवतमाळ-वाशिम, बीड, रावेर या लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदारवारांना पराभूत करण्यात हातभार लावला होता. यात प्रामुख्याने कॉंग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री पराभूत झाले होते. नांदेडमधून अशोक चव्हाण तर सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदेंना वंचितने हिसका दाखवला होता.

हेही वाचा – धार्मिक यात्रेतील भाविकांना शस्त्रे कुणी पुरवली? हरियाणा हिंसाचारावरून केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला फटकारले

वंचित सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाबरोबर युतीत आहे. मविआमधील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांवर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा विशेष राग असल्याचे यापूर्वी वारंवार समोर आले आहे. त्यामुळे वंचितला मविआमध्ये घेण्यास हे दोन्ही पक्ष तयार नव्हते. त्यातच अजित पवार यांनी राष्ट्रवादीला भगदाड पाडून भाजपबरोबर सत्तेत सहभागी होणे पसंत केले आहे. तसेच भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा भागात प्रखर पक्षविस्तार करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीला भाजपची ‘बी’टीम म्हणून कॉंग्रेसकडून हिणवले जाते. अशा परिस्थितीत भरभक्कम अर्थबळ पाठीशी असणाऱ्या भारत राष्ट्र समितीने वंचितला युती करण्यासाठी एक हात पुढे केला तर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून वंचित भारत राष्ट्र समितीसोबत राज्यात लोकसभेच्या जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित पुन्हा २०१९ प्रमाणे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समितीच्या सोबत एकत्र येऊन मविआच्या उमेदवारांच्या मतांमध्ये विभाजन करण्याची भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटू लागली आहे.