Maharashtra Assembly Election 2024 : मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल

येवला मतदारसंघातून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला

various parties leaders in maharashtra filed nomination papers today on occasion of gurupushyamrut
गुरुपुष्यामृताचा मुहुर्त साधत राज्यात विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी उमेदवारी अर्ज आज दाखल केले.

मुंबई : गुरुपुष्यामृताचा मुहुर्त साधत राज्यात विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी उमेदवारी अर्ज आज दाखल केले. यात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील, भास्कर जाधव आदींचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारपर्यंत मुदत असली तरी गुरुवारी गुरुपुष्यामृताचा योग साधून सर्वच पक्षांच्या विविध नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या दिवसाची निवड केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी अर्ज दाखल करणार होते. तशी तयारीही करण्यात आली होती. परंतु नवी दिल्लीत महायुतीच्या बैठकीला जावे लागल्याने शिंदे आता सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

येवला मतदारसंघातून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींनी अर्ज दाखल केले. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते.

हेही वाचा >>> जागावाटपावरून पुन्हा ताणाताणी; संजय राऊत वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक वाद

उमेदवारांची मालमत्ता

आदित्य ठाकरे (शिवसेना- ठाकरे गट)

● एकूण मालमत्ता- २३ कोटी ४३ लाख (२०१९ची मालमत्ता १७ कोटी ६९ लाख)

● स्थावर- ६ कोटी ४ लाख

● जंगम- १७ कोटी ३९ लाख

● गुन्हे नोंद- जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल

● शिक्षण- विधि शाखेची पदवी

● नजीब मुल्ला (अजित पवार गट-कळवा- मुंब्रा)

● एकूण मालमत्ता (२०२४) – ७६ कोटी ८७ लाख

● स्थावर – ७१ कोटी

● जंगम – ५ कोटी ८२ लाख

● गुन्हे नोंद – दोन गुन्हे

● शिक्षण – बी. कॉम

● मंगलप्रभात लोढा (भाजप)

● एकूण मालमत्ता- ४४७ कोटी (२०१९ची मालमत्ता – ४४१ कोटी ६५ लाख)

● स्थावर- २१८ कोटी

● जंगम- २२८ कोटी

● गुन्हे नोंद- जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल

● शिक्षण- पदवी

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Various parties leaders in maharashtra filed nomination papers today on occasion of gurupushyamrut print politics news zws

First published on: 25-10-2024 at 06:04 IST
Show comments