अविनाश कवठेकर

पुणे : राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी, कोण शत्रू होतो तेच समजत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत माेरे ऊर्फ तात्या या प्रकाराला अपवाद. स्वपक्षातीलच नव्हे, तर विरोधी विचारांच्या लोकांच्या मदतीला धावणारा नेता हीच मनसे नेते वसंत मोरे यांची खरी ओळख. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे जनतेच्या लहान सहान गोष्टींसाठीही सातत्याने लढा देत असतात. अन्यायाविरोधात आक्रमक पण अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याची मोरेंची हातोटी सुपरिचित आहे. त्यामुळेच पुण्यातील राजकीय वर्तुळात एक तडफदार, डॅशिंग आणि मनसेचा फायरबँण्ड नेता अशी त्यांची ओळख झाली आहे. मनसेबरोबरच अन्य पक्षातील नेत्यांना ही तात्यांचे राजकीय वजन माहिती असल्याने त्यांचा राजकीय दबदबाही वाढत आहे.

On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
ajit pawar on ravi rana
विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….

हेही वाचा… पंकज गोरे : रांगड्या शिवसेनेत उच्चविद्याविभूषित आणि कार्यमग्न कार्यकर्ता

वसंत कृष्णाजी मोरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते वादळ ठरले आहे. शेती आणि इतर व्यवसाय करणारे मोरे यांचे नेतृत्व निर्भीड आणि संघर्षमय आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय हाती घेतल्यानंतर मोरे यांनी निर्भिडपणे आपले मत मांडत त्या धोरणाबद्दल आपली हरकत नोंदवली होती. त्यावेळी ते उभ्या महाराष्ट्राला माहिती झाले. बी. कॉमपर्यंतचे शिक्षण घेतलेले वसंत मोरे हे शिवसेनेत असताना राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर स्वाभाविकच वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्या मनसेत गेले. २००७ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिल्यांदा कात्रज प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१२ आणि २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतही त्यांनी सहज विजय मिळविला. मोरे आता ४८ वर्षांचे असून गेल्या १५ वर्षांहून अधिकच्या राजकीय कारकिर्दीत निवडणुकीतील प्रभागांची रचना आणि नावे बदलली पण नगरसेवक म्हणून जनतेसाठी केलेल्या कामामुळे त्यांचा करिष्मा कायम राहिला. प्रभाग कोणताही असो किंवा कसाही असो जनतेसाठी काम करतच राहणार हा विश्वास ठेवणारे वसंत मोरे यांची हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही.

हेही वाचा… देवानंद पवार : शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात वसंत मोरे यांचा जन्म झाला. आपल्या भागात राज्यकर्त्यांकडून होत असलेली जनतेची फसवणूक त्यांनी पहिली होती. हे चित्र कुठे तरी बदलले पाहिजे आणि आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही कर्तव्याची भावना मनात ठेऊन त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हॅटट्रीक करणारे ते राज्यातील पहिले नगरसेवक आहेत.

हेही वाचा… सचिन कल्याणशेट्टी : समाजकारण आणि राजकारणाची हुकमी गोळाबेरीज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरेंच्या नेतृत्व गुणाला तसेच त्यांनी मांडलेल्या या लोकसेवेच्या यज्ञाला कायमच पाठिंबा दिला. पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्याही त्यांनी निष्ठेने पार पाडल्या. समाजमाध्यमातही वसंत मोरे तेवढेच सक्रिय असतात. बदललेली राजकीय परिस्थिती समाजमाध्यमातून ते व्यक्त करत असलेल्या भावना कायमच चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय ठरतात. समाजमाध्यमातून त्यांच्याकडे कोणी मदतीची याचना केली आणि त्यांनी मदत केली नाही, असे कधी होतच नाही. रात्री रस्त्यावर दिसेलेली एकटी युवती असो की बसमधून प्रवास करणारी एकटी विविहित महिला असो त्यांना सुखरूप घरी पोहोविल्याच्या काही घटनाही मोरे हे सामाजिकदृष्ट्या किती संवेदनशील आहेत, हे दर्शविणा-या आहेत. करोना संसर्ग काळात त्यांनी केलेल्या कामामुळे तर मोरेंची दखल वर्ल्ड बुक रेकॉर्ड लंडन या संस्थेकडून घेण्यात आली.

हेही वाचा… निलेश राऊत : माणसांना जपणारा कार्यकर्ता

जेव्हा संकट येते तेव्हा ते सोबत संधीही घेऊन येते. ती संधी करोनानाने दिली असे मोरे सांगतात. जसजसा करोनाचा वेग बदलत गेला तसा त्या विरोधात लढण्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी बदल केला. म्हणजे जेव्हा धान्याची गरज होती, तेव्हा त्याचे वाटप केले, जेव्हा हॉस्पिटलची बिले कमी करायची होती तेव्हा त्यासाठी कसून प्रयत्न केले, बेड मिळत नव्हते ते मिळवून दिले, ॲम्ब्युलन्स मिळाली नाही ती ही मिळवून दिली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा मिळवून दिली, हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती, तर स्वखर्चाने त्यांनी हॉस्पिटलची उभारणी केली. कर्जाचे हप्ते थकले म्हणून गाड्या ओढायला आले तर हातात दांडा घेऊन प्रतिकार केला. करोनाने त्याचे अनेक रंग बदलले पण त्यांनी जनतेची साथ नाही सोडली म्हणून त्यांच्या कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली.

हेही वाचा… ‘वेदान्त-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेले? गडकरी म्हणाले, “कारण नसताना लोक राज्यांवरुन…”

खळखट्याक ही मनसेची कार्यपद्धती. पण नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही कार्यपद्धती त्यांनी स्वीकारली असली तरी महापालिकेतील अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवत सामोपचाराने त्यांनी प्रश्न मार्गी लावल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. प्रभागात त्यांनी केलेली विविध विकासकामे त्याची साक्ष देतात. कचऱ्यासारख्या विषयात प्रभागाला आयएसओ मानांकन घेणारे ते देशातील पहिले नगरसेवक ठरले. कात्रज उद्यान फुलराणी सुरू करून महापालिकेला वर्षाला २९ लाखांचे उत्पन्न त्यांनी मिळवून दिले. पंधरा वर्षात विविध संकल्पनांवर आधारित १६ उद्यानांची उभारणी त्यांनी केली असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वात सुंदर अभ्यासिका निर्माण करण्याचा बहुमान मोरे यांना मिळाला आहे.