सांगली : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने वसंतदादा गट एकसंघ होत असल्याचे चित्र दादांचे वारसदार विशाल पाटील आणि श्रीमती जयश्री पाटील यांनी निर्माण केले आहे. गेली नऊ वर्षे काँग्रेसमध्येच असून दोन्ही गट स्वतंत्रपणे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होते. या प्रयत्नांतना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याकडून खीळ घालण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप दोन्ही गटाचे कार्यकर्ते करीत असतात. आता बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने दादा घराण्यातील थोरली पाती आणि धाकटी पाती एकत्र येत असतील तर ती अभूतपर्व घटनाच मानली गेली पाहिजे. तथापि, विधानसभा निवडणुकीपर्यंत हे ऐक्य अबाधित राहिले तरच अर्थ अन्यथा अनर्थ अशी राजकीय परिस्थिती आहे.

एकेकाळी वसंतदादांचा बालेकिल्ला म्हणून सांगलीची ओळख राज्यभर होती. मात्र, दादांच्या पश्‍चात स्व. मदन पाटील आणि प्रकाशबापू पाटील या चुलत-चुलत बंधूंमध्ये झालेली विधानसभा निवडणूक गोतास काळ ठरली. त्यानंतर दोन्ही गट व्यासपीठावर एकत्र तर खासगीत वेगळी चूल अशी स्थिती होती. याचा फटका स्व. मदन पाटील यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बसला. वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी सत्ताधारी गटापासून फारकत घेत निवडणूक लढवून मदन पाटील यांना पराभूत केले. हा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीसह महापालिका निवडणुकीमध्येही विरोधकांना रसद पुरवठा कोण करत होते याची चर्चा होत राहीली.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Mallikarjun Kharge criticize BJP in nagpur
“बाटना और काटना हे भाजपचे काम” मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित

हेही वाचा – “हिंदू अध्यात्मिक गुरूंनी मिशनरींपेक्षाही अधिक समाजसेवा केली”, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

आजच्या राजकीय स्थितीमध्ये दादा गटाला स्वअस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. ताब्यात असलेला वसंतदादा साखर कारखानाही बँकेच्या ताब्यात आहे. बाजार समितीमध्ये निवडून आलेल्यांनी सोयीस्कर भूमिका घेतल्याने तेथील वर्चस्व संपले आहे. बँकेत दोन्ही गटाकडे संचालक पद असले तरी निर्णय प्रक्रियेत राष्ट्रवादी पर्यायाने आ. जयंत पाटील यांचेच वर्चस्व आहे. या राजकीय संघर्षातून कृष्णा नदी प्रदूषणाची जबाबदारी कोणाची यावरून कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरूआहेत. मद्यार्क प्रकल्प चालविणार्‍या स्वप्नपूर्ती शुगरची मालकी जरी वेगळी असली तरी लाभ कोणाला मिळतो अशी विचारणा आ. पाटील यांनी विधानसभेत करून दादा-बापू वाद अद्याप संपलेला नाही याचे संकेत दिले तर नाहीत ना, अशी शंका कोणाच्या मनात आली तर त्यात चुकीचे ते काय?

दादा गटाने यापूर्वीही गमती जमती केल्या, यामध्ये गमती जमतीमध्ये माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांना दोन वेळा पराभूत व्हावे लागले होते. यामुळे कदम गट दादा गटाचे वर्चस्व स्वीकारेल असे नाही. एकीकडे राष्ट्रवादीची दोन हात करीत असताना दादा गटाला कदम गटाशीही संघर्ष करावा लागतो की काय अशी स्थिती आहे. दादा गटांनेही पर्यायाने विशाल पाटील यांनीही बदलत्या काळाची गरज म्हणून दोन पावले माघार घेऊन तडजोडीचे राजकारण केले तरच भवितव्य आहे. कारण एकावेळी दोन्ही नेत्यांशी सामना अस्तित्वासमोर प्रश्‍न चिन्ह निर्माण करणारा ठरेल.

हेही वाचा – कर्नाटकच्या निवडणुकीत दुधाचा मुद्दा तापला

दादा गटामध्ये मनोमिलन झाल्याचे विशाल पाटील व जयश्री पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले असले तरी श्रीमती पाटील यांची एक कन्या कदम घराण्याची सून आहे. हे नातेसंबंधही लक्षात घ्यायला हवेत. मागील लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारीवर विशाल पाटील यांनी निवडणूक लढविली होती. आता ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. यावेळीही उमेदवारीची लढाई मित्र पक्षांशी करावी लागणार आहे. खरी कसोटी विधानसभा निवडणुकीच्यावेळी लागणार आहे. कारण एका गटाकडे खासदारकी तर दुसर्‍या गटाकडे आमदारकी अशी तडजोड झाली तर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे विधानसभा निवडणुकीसाठी गेली आठ वर्षे प्रयत्नशील आहेत त्यांचे काय, हाही प्रश्‍न उपस्थित होणार आहे. तत्पुर्वी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी केली तर वाट्याला आलेल्या सर्व जागा एकसंघपणे लढविल्या गेल्या तरच या मनोमीलनाला अर्थ, अन्यथा सगळाच अनर्थ.