जगातील सर्वात मोठ्या शिखर परिषदेपैकी एक असलेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटअंतर्गत अनेक उद्योग अन् व्यावसायिक क्षेत्रे एकाच छत्राखाली आले आहेत. अफाट व्यावसायिक क्षमता असलेले नेटवर्किंग आणि ज्ञान सामायिकरणाचे हे व्यासपीठ लाखो जणांसाठी संधी निर्माण करणारे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी गांधीनगर येथील महात्मा मंदिरात व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ चे उद्घाटन करतील. यानंतर ते जागतिक टॉप कंपन्यांच्या सीईओंची बैठक घेणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी GIFT सिटीला भेट देणार आहेत, जिथे ते ग्लोबल फिनटेक लीडरशिप फोरममध्ये आघाडीच्या उद्योगपतींशी संवाद साधतील. २००३ मध्ये मोदी राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिसेंबरमध्ये शिखर संमेलनाला भेट दिल्यानंतर व्हायब्रंट गुजरात समिटमुळे भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे ९ जानेवारी रोजी भारतात दाखल झाले आहेत.

‘व्हायब्रंट गुजरात समिट’ म्हणजे काय?

खरं तर व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची १० वी आवृत्ती गुजरातमधील गांधीनगर येथे १० ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित केली जात आहे. त्याची थीम ‘गेटवे टू द फ्युचर’ अशी आहे. शिखर परिषदेची ही दहावी आवृत्ती “यशाचे शिखर म्हणून व्हायब्रंट गुजरातची २० वर्षे” साजरी करेल. या वर्षीच्या शिखर परिषदेसाठी ३४ भागीदार देश आणि १६ भागीदार संस्था आहेत. याव्यतिरिक्त ईशान्येकडील प्रदेश विकास मंत्रालय व्हायब्रंट गुजरात प्लॅटफॉर्मचा वापर ईशान्येकडील प्रदेशांमध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यासाठी करेल. टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन, शाश्वत उत्पादन, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि नवीकरणीय ऊर्जा आणि टिकाऊपणाकडे वाटचाल यांसारख्या जागतिक स्तरावरील संबंधित विषयांवर चर्चासत्र आणि परिषदांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन या शिखर परिषदेत केले जाणार आहे. व्हायब्रंट गुजरातला व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट म्हणूनही ओळखले जाते आणि हा गुजरातमध्ये आयोजित केलेला द्विवार्षिक गुंतवणूकदारांचा जागतिक व्यवसाय कार्यक्रम आहे. व्यवसायातील नेते, गुंतवणूकदार, विचारवंत, धोरण आणि मत निर्मात्यांना एकत्र आणण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. गेल्या काही काळापासून ते गुजरातचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक मंच बनले आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल ट्रेड शोमध्ये कंपन्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन करतील. ई-मोबिलिटी, स्टार्ट-अप, एमएसएमई, ब्लू इकॉनॉमी, ग्रीन एनर्जी आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर हे या ट्रेड शोचे काही फोकस क्षेत्र आहेत. खरं तर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मोदींच्या विचारांची उपज म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाते, विशेष म्हणजे गोध्रा जातीय दंगलीनंतर सुमारे एक वर्षानंतर २००३ मध्ये शिखर परिषदेला सुरुवात झाली.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
book review kashmir under 370 a personal history by j and ks former director general of police
बुकमार्क : काश्मीरचे भूतभविष्य…
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय

व्हायब्रंट गुजरात समिटची १०वी आवृत्ती महत्त्वपूर्ण का?

पाच वर्षांच्या अंतरानंतर व्हायब्रंट गुजरात समिटचे आयोजन केले जात आहे, शेवटची शिखर परिषद २०१९ मध्ये कोविड १९ साथीच्या आधी आयोजित करण्यात आली होती. या शिखर परिषदेला त्याच्या स्थापनेपासून २० वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याला ‘समिट ऑफ सक्सेस’ असे नाव देण्यात आले आहे. २००९ पासून राज्य सरकारने या कार्यक्रमासाठी भागीदार देशांनाही सहभागी करून घेतले आहे. २००९ मध्ये जपान सहभागी झाला होता. तेव्हापासून भागीदार देशांची संख्या हळूहळू वाढली आहे, १० व्या आवृत्तीत ३४ खातरजमा केलेले भागीदार देश आहेत, ज्यात प्रथमच २१ देशांचा समावेश आहे. मात्र, २०११ पासून पाचवेळा भागीदार असलेला कॅनडा या यादीतून गायब झाला आहे. खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून कॅनडाचा भारताशी असलेले संबंध दुरावले आहेत हेसुद्धा अनुपस्थितीचे कारण असू शकते.

हेही वाचाः आपचा गुजरातमधील आदिवासी चेहरा, आता लोकसभा निवडणुकीचे उमेदवार; कोण आहेत चैतर वसावा?

व्हायब्रंट गुजरात समिट गुजरातच्या वाढीसाठी कसा महत्त्वाचा?

गेल्या २० वर्षांत गुजरातमधील महत्त्वाच्या घडामोडी व्हायब्रंट गुजरात समिटच्या दृष्टीकोनातून पाहिल्या गेल्या आहेत. २९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या कार्यालयाने सोशल मीडियावर व्हायब्रंट गुजरात समिटला “संस्था” म्हटले. पोस्टबरोबरच्या प्रचारात्मक व्हिडीओमध्ये प्रख्यात गुजराती अभिनेता मल्हार ठाकर अहमदाबाद मेट्रोवर सहप्रवाशांबरोबर संभाषण करताना आणि २००३ पासून गुजरातमधील प्रत्येक मोठ्या पायाभूत सुविधांच्या विकासामागे व्हायब्रंट गुजरात समिट “कोणत्याही प्रकारे” असल्याचे सांगत आहे.

एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातची अलीकडील वाढ केवळ अधिक वैविध्यपूर्ण नाही तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतही अधिक योगदान देते. “गेल्या १० वर्षांत राष्ट्रीय विकासात गुजरातचे योगदान ७.२ टक्क्यांवरून ८.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. भारताचा विकास होत आहे, पण गुजरात वेगाने वाढत आहे,” असे अधिकारी म्हणाला. “याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजरातचा विकास हा खूप वैविध्यपूर्ण आहे. पूर्वी गुजरात फार्मा आणि केमिकल क्षेत्रासाठी ओळखला जात होता. परंतु आता आम्ही इतर क्षेत्रांमध्ये तसेच ऑटोमोबाईल्स, सिरॅमिक्स, अक्षय ऊर्जा आणि बंदरे या क्षेत्रात उल्लेखनीय वाढ केली आहे. आम्ही आता सेमीकंडक्टर, विमान निर्मिती, संरक्षण, हायड्रोजन इकोसिस्टम, अंतराळाशी संबंधित उत्पादन इत्यादीसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करीत आहोत.

हेही वाचाः भाजपा संपूर्ण यूपीतील मुस्लिम महिलांपर्यंत पोहोचणार, ७५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लक्ष्य करणार

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “गुजरातींच्या उद्योजकीय भावनेमुळे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या भक्कम मूलभूत तत्त्वांमुळे विकास झाला आहे. परंतु ही वाढ २० वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी टिकून राहिली आहे आणि ही एक मोठी उपलब्धी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गुजरातचा ऑटोमोबाईल हब अन् भारताची गॅस राजधानी म्हणून उदयास येणे, २००१ च्या भूकंपानंतर कच्छचे पुनरुत्थान आणि २४-७ वीज पुरवठ्यापर्यंतच्या पायाभूत सुविधांचा विकास हे गुजरातच्या विकासाचे महत्त्वाचे क्षेत्र मानले जातात आणि आता गुजरातमध्ये यूएस-आधारित इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाच्या संभाव्य गुंतवणुकीबद्दल अटकळ बांधली जात आहे.

व्हायब्रंट गुजरात समिटनेच मोदींना जागतिक नेता बनवले का?

गुजरातमधील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने महत्त्वाचा दावा केलाय, या शिखर परिषदेने राष्ट्रीय राजकारणात मोदींचे व्यक्तिचित्र उंचावण्यासाठी मदत केली आहे. विशेषत: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालसह इतर अनेक राज्यांनी या कल्पनेचे अनुकरण केले आहे. “नक्कीच व्हायब्रंट गुजरातने मोदींना राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यात आणि त्यांना प्रसिद्ध करण्यास मोठी भूमिका बजावली आहे. खरं तर ते व्यावसायिक नाहीत तरीही त्यांना अशी कल्पना सुचली आणि त्यांना त्याला वेगळी उंची मिळवून दिली. राजकीय व्यक्ती असा विचार कधीच करणार नाही,” असे नेते म्हणाले. “२००३ मध्ये जेव्हा मोदींनी व्हायब्रंट गुजरात समिट लाँच केले आणि ते प्रत्येक वर्षी चालू ठेवले, तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवायचे. आमचे राजकीय विरोधक व्हायब्रंट गुजरातची तुलना अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या इंडिया शायनिंग मोहिमेशी करत असत आणि ते यशस्वी होणार नसल्याचं सांगत. पण आता व्हायब्रंट गुजरात समिट पाहा आणि ते कुठे उभे आहे, ” असेही भाजपचे नेते म्हणतात. “गिफ्ट सिटी आगामी व्हायब्रंट गुजरात समिटच्या फोकस एरियाचा एक भाग आहे. जरा कल्पना करा की, गुजरात दुबईशी स्पर्धा करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातने भक्कम पायाभूत सुविधा, पाणी, वीज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक गुंतवणूकदारांना सुरक्षिततेची भावना दिली आहे आणि त्याचा राजकीय फायदा होणे अगदी स्वाभाविक आहे. लोकांना विकास हवा आहे आणि व्हायब्रंट गुजरात समिट तेच आणत आहे,” असेही तो भाजप नेता म्हणाला. गुजरात केडरचा एक वरिष्ठ आयएएस अधिकारी म्हणाला, “राजकारण म्हणजे लोकांच्या आकांक्षा वाढवणे आणि नंतर त्या पूर्ण करणे. मला वाटतं व्हायब्रंट गुजरात समिटच्या माध्यमातून मोदी ते करू शकले आहेत आणि त्याचा राजकीय फायदा घेत आहेत.”

व्हायब्रंट गुजरात समिटवर विरोधकांची टीका

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटला सुरुवातीपासूनच विरोधकांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींच्या वैयक्तिक ब्रँडिंगसाठी व्हायब्रंट गुजरात समिटचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केला आहे. गुजरात विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अमित चावडा म्हणाले, “हे खरे आहे की, व्हायब्रंट गुजरात समिटमुळेच मोदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयास आले आहेत. पण व्हायब्रंट गुजरात समिटच्या माध्यमातून ते मोदींचे वैयक्तिक ब्रँडिंग आहे. त्याचा गुजरातला तसा फायदा झालेला नाही. “पूर्वीदेखील अनेक उद्योगांनी गुजरातची निवड केली होती आणि भविष्यातही ते करत राहतील. गुजरातमध्ये नेहमीच गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण होते. जर व्हायब्रंट गुजरात समिट खरोखरच यशस्वी झाले असेल, तर आम्ही मागणी करतो की, सरकारने आतापर्यंत केलेल्या सर्व व्हायब्रंट गुजरात समिट इव्हेंट्स आणि त्यात स्वाक्षरी केलेले सामंजस्य करार, तसेच त्यापैकी किती अंमलात आणले आहेत, याबद्दल श्वेतपत्रिका जारी करावी, ” असेही चावडा म्हणाले.

Story img Loader