पीटीआय, तिरुअनंतपुरम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन गुन्हेगारी कायद्यांचा मसुदा ‘पार्ट टाइमर’द्वारे (अर्धवेळ लोकप्रतिनिधी) तयार केला गेला आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी केल्यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. चिदम्बरम यांचे वक्तव्य अक्षम्य असून ते मागे घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. ‘संसदेत आम्ही पार्ट टाइमर आहोत काय,’ असा सवाल त्यांनी विचारला.

‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पी. चिदम्बरम यांनी सांगितले की, नवीन गुन्हेगारी कायदे पार्ट टाइमरनी तयार केले आहेत. कायदा आयोगाचा संदर्भ न घेता मोठे कायदे कधी मंजूर करण्यात आले?

चिदम्बरम यांच्या या वक्तव्यावर धनखड यांनी संताप व्यक्त केला. चिदम्बरम यांची विधाने बदनामीकारक व अपमानास्पद आहेत. आम्ही संसदेत पार्ट टाइमर आहोत का? हा संसदेच्या शहाणपणाचा अक्षम्य अपमान आहे… खासदारांवर जर ‘अर्धवेळ’ असा शिक्का मारला जात असेल, तर अशा कथनाचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत, असे उपराष्ट्रपती म्हणाले. केरळमधील अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयएसटी) दीक्षांत समारंभाला संबोधित करताना उपराष्ट्रपती धनखड बोलत होते. ‘मी चिदम्बरम यांना या व्यासपीठावरून आवाहन करतो की त्यांनी खासदारांबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य मागे घ्यावे,’ असे धनखड यांनी सांगितले

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vice president question on p chidambaram criticism about parliament print politics news amy