अमरावती : लोकसभा निवडणूक आटोपून चार महिन्‍यांचा कालावधी उलटला असला, तरी अमरावती जिल्‍ह्यात भाजपच्‍या नवनीत राणा यांच्‍या पराभवाचे कवित्‍व संपलेले नाही. सूडाच्‍या राजकारणाचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. राणा दाम्‍पत्‍याने प्राप्‍त अधिकारांचा पुरेपूर वापर करीत विरोधकांच्‍या मतदारसंघांत टाकलेले डाव यशस्‍वी होतात, की फसतात, याची चर्चा रंगली आहे.

दशकभरापूर्वी माजी खासदार नवनीत राणा यांच्‍या जातवैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेऊन शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उघडलेल्‍या मोहिमेनंतर अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍यात सुरू झालेला वाद अजूनही शमण्‍याची चिन्‍हे नाहीत. अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍य महायुतीत असले, तरी त्‍यांच्‍यात मतैक्‍य होऊ शकलेले नाही. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ हे दर्यापूर मतदारसंघातून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून रिंगणात आहेत. पण, नवनीत राणा यांना विरोध केल्‍याचा सूड म्‍हणून आमदार रवी राणा यांनी भाजपमध्‍ये बंड घडवून आणले आणि माजी आमदार रमेश बुंदिले यांना युवा स्‍वाभिमान पक्षाची उमेदवारी दिली. त्‍यामुळे महायुतीतच फूट पडली. हा वाद मिटावा, म्‍हणून आनंदराव अडसूळ यांनी प्रयत्‍न सुरू केले. पण, राणा अडून आहेत. रमेश बुंदिले हे राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर होते. महायुतीतील बंडखोरीबाबत नवनीत राणा यांनी मौन बाळगले आहे. अभिजीत अडसूळ यांना अपशकून करण्‍यासाठीच राणांनी ही खेळी केल्‍याचा आरोप केला जात आहे.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे ‘कुणबी कार्ड’, सहापैकी तीन उमेदवार कुणबी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे ‘कुणबी कार्ड’, सहापैकी तीन उमेदवार कुणबी

महायुतीत मेळघाटची जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला सुटावी यासाठी आमदार राजकुमार पटेल हे प्रार्थना करीत राहिले, पण लोकसभा निवडणुकीत राजकुमार पटेलांनी केलेला विरोध राणा दाम्‍पत्‍य विसरले नव्‍हते. त्‍यांनी ही जागा भाजपसाठी खेचून आणली. सहा महिन्‍यांपूर्वी भाजपमध्‍ये प्रवेश करणारे काँग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे यांना भाजपची उमेदवारी मिळवून देण्‍यात नवनीत राणा यशस्‍वी ठरल्‍या. अखेर राजकुमार पटेल यांना स्‍वगृही प्रहार जनशक्‍ती पक्षात परतावे लागले.

अचलपूर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी प्रवीण तायडे यांना मिळवून देण्‍यात राणा यांच्‍या गटाने केलेली शिष्‍टाई, तिवसा मतदारसंघात शिवसेनेतून भाजपमध्‍ये आलेल्‍या राजेश वानखडे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी केलेला पाठपुरावा, यातून राणा यांचा गट भाजपच्‍या पक्षसंघटनेवर पकड मजबूत करण्‍याच्‍या प्रयत्‍नात असल्‍याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – जरांगेची मतपेढी अपक्षांच्या पाठीशी ?

नवनीत राणा यांना विरोध करण्‍यात प्रहार जनशक्‍ती पक्षाचे बच्‍चू कडू, आनंदराव अडसूळ यांच्‍यासह तिवसाच्‍या आमदार यशोमती ठाकूर या आघाडीवर होत्‍या. पराभवाचा सूड उगवण्‍यासाठी या विरोधकांना नामोहरम करण्‍यासाठी राणा दाम्‍पत्‍याने प्रयत्‍न सुरू केले खरे, पण रवी राणा यांच्‍यासमोर त्‍यांच्‍याच बडनेरा मतदारसंघात भाजपचे बंडखोर तुषार भारतीय यांनी आव्‍हान उभे केले आहे. राणा हे आव्‍हान कसे पेलणार आणि त्‍यांचे उपद्रवमूल्‍य कुणाला नुकसानदायक ठरणार, याची चर्चा रंगली आहे.