गडचिरोली : नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी विधानसभेत ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात तीनही विधानसभेत सर्वाधिक बंडखोरी काँग्रेसमध्ये झाली असून एकूण सात इच्छुक उमेदवारांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. तर भाजपमधून अहेरी आणि गडचिरोलीत दोघांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीपुढे बंडखोरी रोखण्यासाठी आव्हान उभे झाले आहे.

वाढलेल्या इच्छुकांच्या संख्येमुळे शेवटच्या क्षणी जाहीर झालेल्या यादीत नाव नसलेल्या युती-आघाडीतील उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. गडचिरोलीत भाजप आणि काँग्रेसने नवा चेहरा देत धक्कातंत्र वापरले. आरमोरीत देखील काँग्रेसने माजी आमदार आनंदराव गेडाम यांना डावलून रामदास मसराम यांना संधी दिली. तर अहेरीत अपेक्षेप्रमाणे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी दिली. यामुळे भाजपकडून इच्छुक माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. तर काँग्रेसकडून इच्छुक हणमंतू मडावी यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला असून तेसुद्धा अपक्ष लढतील. त्यामुळे सर्वाधिक चुरस अहेरी विधानसभेत पाहायला मिळत आहे.

vidarbh election
विदर्भातील निवडणूक रिंगणात कोण कोणाचे नातेवाईक ?
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Gadchiroli, Congress Armori, former MLA,
गडचिरोली : आरमोरीत अखेर काँग्रेसने पत्ते उघडले, माजी आमदाराच्या स्वप्नावर पाणी
loksatta editorial on fake court set up in ahmedabad zws
अग्रलेख : भामटे आणि तोतये…
in nagpur discomfort increased in bjp large group is preparing to leave party
गडचिरोली भाजपात असंतोषाची ठिणगी; एक मोठा गट पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत…
Dharmaraobaba Atram is nominated from Aheri by NCP and BJPs claim is futile
‘अहेरी’तून धर्मरावबाबा आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी, भाजपाचा दावा निष्फळ
BJPs Youth Aghadi disrupted the savidhan bachao maharashtra bachao lecture proving constitutional threats exist
“वर्ध्यातील चारही जागा भाजपच लढणार,’’ नितीन गडकरी यांच्या विश्वासू नेत्याचा दावा
nagpur Former MLA Mallikarjuna Reddy alleged that Gadkaris loyal supporters sidelined after his suspension
“भाजपमध्ये गडकरी समर्थकांना, डावलले जाते ” माजी आमदाराचा गंभीर आरोप

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांची साथ आमदार गीता जैन यांना ठरली मारक ?

आरमोरीत भाजपकडून कुणीही बंडखोरी केलेली नाही. याठिकाणी पक्षाने आमदार कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. मात्र, माजी आमदार आनंदराव गेडाम यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारून रामदास मसराम या नव्या चेहऱ्याला पुढे केले आहे. याठिकाणी गेडाम यांच्यासह डॉ. शिलू चिमूरकर, वामनराव सावसागडे या काँग्रेसच्या तिघांनी बंडखोरी केली आहे. गडचिरोलीत देखील माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र विश्वजित कोवासे आणि डॉ. सोनल कोवे यांनी अर्ज दाखल केला आहे. हे दोघेही अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. तर भाजपकडून डॉ. देवराव होळी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या क्षणी पक्षाकडून डच्चू मिळाल्याने ते दुखावले आहेत. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून भाजपकडून आमदार परिणय फुके आणि काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा – उत्तर नागपूर मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत! काँग्रेसच्या डॉ. नितीन राऊत यांच्यासमोर मतविभाजानाचे आव्हान

..तर पक्षातून हकालपट्टी

बुधवारी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार पक्षाच्या मेळाव्यानिमित्त गडचिरोलीत आले असताना त्यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, कुणीही बंडखोरी करणार नाही. यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. तरीही बंडखोरी केल्यास त्यांना पक्षातून घरचा रस्ता दाखविण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे ४ नोव्हेंबरला कोण-कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.