नागपूर: अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तर नागपूर मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस नेते व विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात भाजपचे डॉ. मिलींद माने, बसपचे मनोज सांगोळे, वंचितचे अशोक वाघमारे, खोरिपचे चंद्रकांत रामटेके व अपक्ष अतुल खोब्रागडे यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा उत्तर नागपूरची लढत बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघावर काँग्रेस, भाजप आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने यापूर्वी सत्ता मिळवली आहे. १९७२ मध्ये नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून १ हजार ८५८ मतांनी फॉरवर्ड ब्लॉकचे दौलतराव हुसन गणवीर हे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे गणपत भगत यांना पराभूत केले होते. तर १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या (खोब्रागडे) गटाने विजय मिळवला होता. परंतु १९९० नंतर रिपाइं (खो) ची ताकद येथे कमी होत गेली. ही पोकळी मधल्या काळात बहूजन समाज पक्षाने भरून काढली. परंतु, रिपब्लिकन पक्षाचा गड असलेल्या उत्तर नागपूरमध्ये बसपला हवे तसे यश मिळवता आले नाही. बसपचे नगरसेवक निवडून आले असले तरी विधानसभेमध्ये त्यांना अद्याप यश मिळाले नाही. मात्र, बसपाने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसला फटका बसला आहे.

हेही वाचा – एमआयएमचे वारिस पठाण भिवंडीतून रिंगणात, मतविभाजनाचा फटका काँग्रेसला ?

डॉ. नितीन राऊत विरुद्ध डॉ. माने

भाजपने यावेळी पुन्हा एकदा डॉ. मिलींद माने यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार डाॅ. नितीन राऊत यांच्यासमोर डॉ. माने यांचे आव्हान राहणार आहे. सोबतच बसपचे सांगोळे, वंचितचे अशोक वाघमारे, खोरिपचे चंद्रकांत रामटेके व अपक्ष अतुल खोब्रागडे यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात आहेत यांच्यामुळे दलित मतांचे विभाजन अटळ आहे. याचा फटका काँग्रेसला बसू शकतो.

हेही वाचा – जशास तसे भूमिकेतून शिंदे गटाचे अजित पवार गटाविरुद्ध उमेदवार

१९९५ साली भाजपचे बढेल विजयी झाले होते

उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात १९७२ पासून अनधिकृत झोपडपट्ट्यांचा गंभीर प्रश्न आहे. यातही काही झोपडपट्ट्यांना अधिकृत करण्यात आले असले तरी अनेकांचा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे. १९९५ साली भाजपचे भोला बढेल या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर १९९९ साली काँग्रेसचे नितीन राऊत यांनी विजय मिळवला. २००४ आणि २००९ मध्ये देखील ते विजयी झाले. मात्र २०१४ मध्ये डॉ. मिलिंद माने यांनी राऊत यांचा पराभव केला होता. परत २०१९ मध्ये नितीन राऊत विजयी झाले आणि आता पुन्हा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election 2024 big fight in north nagpur constituency this year the challenge of dividing votes before nitin raut of congress print politics news ssb