नागपूर : एकेकाळी राजकीय प्रचार म्हटले की, देशभक्तीपर गीत बस एवढेच समीकरण होते. यात फार तर राष्ट्रीय पक्षांनी तयार केलेले गाणी वाजविली जायची, मात्र आताच्या निवडणुकांमधील प्रचाराचे चित्र संपूर्ण बदलेलेे आहे. समाजमाध्यमांचा उगम झाल्यामुळे राजकीय प्रचार अधिक ‘सिनेमॅटिक’ आणि ‘सांगितिक’ झाला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीतही राजकीय प्रचाराची ही ‘संगीत’ खुर्ची लक्षवेधी ठरत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यात प्रमुख राजकीय पक्षच नव्हे तर छोटे पक्ष आणि अपक्षही आघाडीवर आहेत.

हेही वाचा >>>आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात

राजकीय प्रचार ‘डिजिटल’ झाल्यामुळे प्रचारात नवोन्मेष बघायला मिळतो. रील्सच्या या जगात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष गीत तयार होत असल्याचे चित्र आहे. भाजपने ‘तुुमची आमची भाजपा सर्वांची…’ या गीताच्या माध्यमातून तर काँग्रेसने पक्षाने ‘यंदा पंजा…’ या गीतातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय नेते केद्रीत प्रचारगीतेही राज्यात धुमाकुळ घालत आहे. यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित बाहुबली चित्रपटासारखे ‘देवाभाऊ देवेंद्र है…’ तसेच अजित पवार यांना उद्देशून तयार केलेले ‘दादांचा वादा…’ हे गीत चर्चेत आहे. शरद पवार यांच्यावर आधारित ‘शरद पवार पुन्हा…’ हे गीत देखील समाजमाध्यमांवर चांगलेच गाजत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, हे सर्व गीत त्यांच्या अधिकृत समाजमाध्यम स्थळावरून अपलोड केले जात आहेत.

हेही वाचा >>>पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या चिमुरातील सभेची मतदारांमध्ये तुलनात्मक चर्चा

‘कस्टमाईज’ गीतांना मागणी

स्थानिक उमेदवार केवळ पक्षांच्या गीतावर अवलंबून नसून त्यांच्या स्वत:ची गीते तयार करतात आहेत. उमेदवाराच्या कार्याची तसेच त्यांच्या व्यक्तीत्वाचे गुणगान करणाऱ्या ‘कस्टमाईज ’ (गरजेप्रमाणे ) गीतांना भरपूर मागणी आहे. या गीतांमुळे उमेदवार मतदारांशी अधिक जवळीक निर्माण करण्यात उमेदवार यशस्वी ठरतात. याच कारणामुळे गल्लोगल्ली ही गाणी वाजवली जातात. स्थानिक स्तरावर पाच हजार ते पन्नास हजार रुपये या किंमतीत अशाप्रकारची गीते तयार करून मिळतात. 

राजकीय पक्षांचे ‘व्यंग’युद्ध

यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये ‘व्यंग’युद्धाचा नवा प्रकार बघायला मिळत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या धोरणांना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्यावर आधारित पॅरो़डी लघुचित्रपट तयार केले जात आहे. महाराष्ट्र भाजपने अलिकडेच प्रसिद्ध ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या आधारावर ‘एमव्हीए ॲनिमल’ चित्रपट तयार करत भाजपच्या अधिकृत युटुयुब चॅनलवर प्रक्षेपित केला. यात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसारख्या कलाकारांचा वापर करून उपहासात्मक पद्धतीने त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. दुसरीकडे, शरदपवार गटाच्या राष्ट्रवादीनेही अशाच प्रकारचे लघुचित्रपट केले आहे. यात महायुतीतील तिन्ही प्रमुख नेते यांना लक्ष्य करत त्यांच्या धोरणांवर उपहासात्मक भाष्य करण्यात आले आहे. राष्ट्रवादीने या चित्रपटाला ‘भोपळा भाऊ’ असे नाव दिले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ही ‘जाडी चामडी, चमकते युतीची…’ नावाने उपहासात्मक रॅप साँग तयार केला आहे.