ठाणे : अपक्ष आमदार गीता जैन यांना पुढे करत मीरा-भाईदर या भाजपच्या बालेकिल्ल्यावर दावा सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा डाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलटविताना पक्ष निष्ठेच्या बळावर नरेंद्र मेहता यांना पुन्हा एकदा कमळ चिन्हावर लढण्याची संधी दिली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच अपक्ष आमदार गीता जैन यांनी एकसंघ शिवसेनेसोबत आणि अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘धनुष्यबाणाशी’ सलगी करणे भाजपला पटले नव्हतेच. याच काळात मीरा-भाईदर शहरातील संपूर्ण संघटना आपल्या मागे कशी उभी राहील याची पुरेपूर काळजी मेहता यांनी घेतली. पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी जुळवून घेत त्यांची आणि फडणविसांची कृपादृष्टी राहील हेही मेहता यांनी पाहीले. याचे फळ म्हणून सलग तिसऱ्या वेळी पक्षाचे ‘कमळ’ चिन्ह मेहता यांना मिळाले असून मुळच्या भाजपाई असूनही अपक्ष लढण्याची वेळ जैन यांच्यावर आली आहे.

Rajendra Deshmukh karjat
आमदार राम शिंदे व भाजपाला रोहित पवार यांनी दिला मोठा धक्का! भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी
suresh dhas bjp
आष्टी-पाटोद्यावर भाजपचा दावा, आमदार सुरेश धस यांनी घेतली फडणवीसांची भेट
Maharashtra Assembly Election news in marathi
शिंदे गटाचा विरोध डावलून भाजपचे तिकीटवाटप; गायकवाड, केळकर, नाईक, कथोरे यांच्या नावांची घोषणा
Sanjay Kelkar Thane, Thane Shivsena support,
ठाण्यात संजय केळकर यांच्याकडून शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न
MLA Mahale criticize Rahul Bondre that including Fadnavis name in voter list is publicity stunt not vote winning move
“…हा तर आघाडीचा रडीचा डाव अन् स्टंटबाजी,” भाजप आमदार श्वेता महालेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या….
Mira-Bhayandar, Geeta Jain Mira-Bhayandar Assembly,
आमदार गीता जैन यांना रोखण्यासाठी भाजपचा संकल्प

हेही वाचा – उत्तर नागपूर मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत! काँग्रेसच्या डॉ. नितीन राऊत यांच्यासमोर मतविभाजानाचे आव्हान

देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मेहता हे पहिल्यांदा मीरा-भाईदरमधून आमदार म्हणून निवडून आले. २००९ मध्ये या मतदारसंघातून गिल्बर्ट मेन्डोसा हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादीचा वरचष्मा असायचा. तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईकांचे खासदार पुत्र संजीव यांच्या लोकसभा मतदारसंघात ही शहरे मोडत असल्याने नाईकांनीही मीरा-भाईदरमध्ये लक्ष केंद्रीत केले होते. मोदी यांच्या लाटेनंतर मात्र हे गणित बदलले. गुजराती, मारवाडी, जैन, मराठी बहुल मतदारांचा वरचष्मा राहिलेला हा मतदारसंघ अचानक भाजपचा बालेकिल्ला बनला. मोदी यांना साथ देणाऱ्या लोकसभेतील उमेदवाराला येथून ४० ते ५० हजारांच्या घरात मताधिक्य मिळू लागले. २०१४ मध्ये नरेंद्र मेहताही मोठ्या मताधिक्याने येथून निवडून गेले. पाच वर्षांनंतर मात्र येथील राजकीय गणित भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे बदलले.

हेही वाचा – एमआयएमचे वारिस पठाण भिवंडीतून रिंगणात, मतविभाजनाचा फटका काँग्रेसला ?

जैन जिंकल्या, मात्र पक्षनिष्ठेचे काय ?

मीरा-भाईदरचे महापौरपद भूषविलेल्या गीता जैन यांनी २०१९ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर दावा सांगितला. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात नरेंद्र मेहता यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. ठाण्याच्या वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांचे वाद होत राहिले. याच काळात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. खंडणी घेतल्याचा आरोपही झाला. त्यामुळे जैन यांनी अपक्ष अर्ज दाखल करताच त्यांना सहानभूती मिळाली. मेहता यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. मीरा-भाईदरसारख्या बालेकिल्ल्यात पराभव पत्करावा लागल्याची बोच भाजप नेत्यांना होती, मात्र निवडून येताच जैन यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून पाठिंबा दिला. काही दिवसात सत्तेचे गणित बदलले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर महिनाभरात जैन या एकनाथ शिंदे यांना भेटल्या आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि सुरतमार्गे गुवहाटीला पोहचले. त्यांच्या पाठोपाठ तीन दिवसात मेहता गुवहाटीला पोहचल्या आणि शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांच्या शिवसेनेच्या सहयोगी आमदार झाल्या. जैन यांचा हा प्रवास भाजपमध्ये अनेकांना रुचला नव्हता. लोकसभा निवडणुकांच्या तयारी दरम्यान जैन या भाजपच्या अंतर्गत बैठकांना उपस्थित रहात. शिवसेनेच्या कार्यक्रमांनाही त्या जात. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शहर भाजपची सुत्र नरेंद्र मेहता यांच्याकडे आणि त्यांच्या समर्थकांकडे सोपविताच भाजपच्या बैठकांना आमदार जैन यांना निमंत्रण पाठविणे बंद झाले.

मुख्यमंत्र्यांच्या गोटातही संभ्रम

सुरुवातीला जैन यांना पुढे करुन मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने मीरा-भाईदर विधानसभेवर दावा केला. जैन यांनाच उमेदवारी मिळावी असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता. मात्र संपूर्ण भाजप संघटनेवर प्रभाव असलेल्या नरेंद्र मेहता यांना डावलून चालणार नाही असा आग्रह रविंद्र चव्हाण यांनी धरला. लोकसभा निवडणुकीत खासदार नरेश म्हस्के यांच्यासाठी मेहता यांनी मेहनत घेतली होती. चव्हाण आणि म्हस्के या दोघांनीही अखेरच्या टप्प्यात मेहता यांनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह शिंदे-फडणवीस यांच्यापुढे धरला. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीत सुरुवातीला मागे पडलेले मेहता यांना भाजपची सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे.