आसाराम लोमटे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
परभणी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये ठळक उमेदवारांनी आपापल्या पक्षाशी बंडखोरी केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षाशी द्रोह करणाऱ्या या उमेदवारांवर अद्यापही त्या- त्या पक्षांनी मात्र शिस्तभंगाची कारवाई केली नाही. मतदान आठवड्यावर आलेले असताना या बंडखोर उमेदवारांचा प्रचारही रंगात आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या सुरेश नागरे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात विजय भांबळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बंडखोरी करणाऱ्या एकूण सोळा उमेदवारांवर कारवाई केली. या संदर्भातले प्रसिद्धीपत्रकही काँग्रेसच्या वतीने माध्यमांना देण्यात आले मात्र या सोळा जणांच्या यादीत नागरे यांचा समावेश नव्हता.
हेही वाचा >>>भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबा
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सिताराम घनदाट तर पाथरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी बंडखोरी केली आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून आपल्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची उमेदवारी मिळेल अशी घनदाट यांची अपेक्षा होती मात्र महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटास जाहीर झाली. या ठिकाणी विशाल कदम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घनदाट यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपली उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाबाजानी दुर्राणी हे काँग्रेसचे उमेदवार आमदार सुरेश वरपूडकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. घनदाट व बाबाजानी हे दोन्ही माजी आमदार राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे असून दोघांनी बंडखोरी केली असली तरी अद्याप राष्ट्रवादीने या बंडखोरी संदर्भात एका ओळीनेही अधिकृत असा खुलासा केला नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा जिल्ह्यात पार पडली या सभेतूनही बंडखोरांबाबत भाष्य करण्यात आले नाही.
हेही वाचा >>>वंचितच्या भूमिकेमुळे ‘अकोला पश्चिम’चे समीकरण बदलणार
पाथरी विधानसभा मतदारसंघातच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे सईद खान यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजेश विटेकर हे आहेत. सईद खान यांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाने कोणतेही भाष्य केले नाही. एकूणच जिल्ह्यात या तीन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीतही बंडखोरी झाल्यानंतर संबंधितांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.