पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात समाज माध्यमांचा वापर अधिक होत असून, निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी याचा सहज वापर सुरू केला असला, तरी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी पारंपरिक प्रचाराचा धडाका कायम ठेवला आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनुसार झेंडे, उपरणे, फेटे, टोप्या, बिल्ले, भित्तीपत्रके, प्रचार पत्रके दारोदारी वाटण्यासाठी निर्मिती (प्रिंटिंग) व्यावसायिकांच्या व्यवसायाला मोठी मागणी वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता आहे. ३० ऑक्टोबरच्या मुदतीत मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील मतदारसंघातून प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला असून भित्तीपत्रके, प्रचार पत्रके, वाहनांना चिटकविण्यात येणारे छोटे कागदी बिल्ले, प्लास्टिकचे बिल्ले, दुपट्टे, मनोगत, वचननामा आदी पारंपरिक प्रचार साहित्याच्या माध्यमातून उमेदवारांची आणि पक्षाची धोरणे, कामे मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व्यावसायिकांकडे धाव घेतली आहे.

sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
pune election 2024
‘पुणे पॅटर्न’चा शाप!
bjp vs ncp sharad pawar
सोलापुरात बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप राष्ट्रवादीत चुरस
sangli and miraj vidhan sabha
सांगली, मिरजेच्या रणांगणात ‘लाडक्या बहिणी’ची चर्चा ! रिंगणातून बाजूला करण्याचे प्रयत्न
chavadi maharashtra assembly election
चावडी : ‘त्या’ पाच जागा
pm Narendra modi Maharashtra
PM Narendra Modi: मोदींच्या सभांचा ८ नोव्हेंबरपासून धडाका
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा :उमेदवारी देताना ‘लाडकी बहीण’ नावडती

शहरात अप्पा बळवंत चौक, शनिवार पेठ, नारायण पेठ, मोमीन पुरा, पासोड्या विठोबा मंदिर परिसरात निर्मिती व्यवसाय करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. या व्यावसायिकांकडे प्रामुख्याने मनोगत, झेंडे, गांधी टोपी, बिल्ले आणि वचननामे छापण्यासाठी मोठी मागणी आहे. त्यातच दिवाळी सणाच्या निमित्ताने मतदारांना आकर्षित करण्यासाठी शुभेच्छांचे पत्रके छापून वृत्तपत्रांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

साधारणत: दहा रुपयांपासून ते ५००-६०० रुपयांपर्यंत असणारे झेंडे, प्रचारार्थ असलेल्या कार्यकर्त्यांच्या हातात आवश्यक असणारे पक्षचिन्ह असलेले झेंडे, खिशाला लावण्यासाठी आकर्षक बिल्ले आदींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच, आजही उन्हाचा चटका जाणवत असल्याने टोप्यांना जास्त मागणी आहे. २० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत असणारे गळ्यातील उपरणे, १०० रुपयांपासून दीड ते दोन हजार रुपयांपर्यंतचे आकर्षक रंगीत फेटे, आदी वस्तूंसाठी प्रमुख पक्षातील उमेदवारांकडून मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मुरुडकर झेंडेवाले दुकानाचे व्यावसायिक गिरीष मुरुडकर यांनी दिली.

हेही वाचा :‘पुणे पॅटर्न’चा शाप!

महायुती आणि महाविकास आघाडीमुळे मागणीत बदल

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांचे स्वतंत्र पक्षचिन्ह आणि इतर पक्ष असे एकाच वेळी तीन, चार पक्षांचे चिन्ह असलेले उपरणे, टोप्या यांना मागणी होत आहे. यापूर्वी पक्ष स्वतंत्र असल्याने अगोदरच पक्षचिन्ह असलेले आणि प्रचारासाठी लागणारी नेहमीच्या साहित्याची छपाई करून ठेवलेली असायची. मात्र, नवीन आघाड्यांमुळे उमेदवारांच्या मागण्या वेळोवेळी बदलत आहेत.

Story img Loader