Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (२३ नोव्हेंबर) जाहीर करण्यात आले आहेत. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला कमी जागांवर समाधान मानावे लागले होते. त्याची कसर महायुतीने विधानसभा निवडणुकीत भरून काढली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ पैकी २३१ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून याबरोबरच देशातील सर्वात संपन्न राज्यात जोरदार पुनरागमन केले आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशापाठोपाठ भाजपाने महाराष्ट्रातदेखील मोठं यश मिळवलं आहे. राज्यात भाजपाने लढवलेल्या १४८ पैकी की १३२ जागांवर विजय मिळवला आहे. हा विजय महायुतीमधील सर्वच घटक पक्षांसाठी एक आश्चर्याचा धक्का होता. भाजपाला विदर्भ, कोकण, मराठवाडा यासह संपूर्ण राज्यभरातून पाठिंबा मिळाल्याचे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने शेतकऱ्यांची नाराजी, मराठा आरक्षण आणि बेरोजगारी अशा प्रश्नांचा यशस्वीपणे सामना केला.

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ladki Bahin Yojana Next Installment Date
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस

आता मुख्यमंत्री कोण होणार?

भाजपा जवळपास ९० टक्क्यांच्या स्ट्राइक रेटसह स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यापासून फक्त १२ जागा दूर आहे. यामुळे भाजपाबरोबरच शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्येही मुख्यमंत्रिपद हे भाजपाकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे, पण भाजपा नेतृत्वाने अद्याप यावर निर्णय घेतला नाहीये. तसेच भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे महायुतीसाठी चांगली भावना तयार झाली आहे आणि याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

महायुतीला विदर्भ, मराठवाड्यात यश

शनिवारी (२३ नोव्हेंबर) मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातींच्या कलांमध्ये महायुतीने आघाडी घेतली, ही आघाडी नंतर आणखी मजबूत होत गेली. पण, महायुतीसाठी कठीण समजल्या जाणाऱ्या विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांत निवडणूक निकालाचं चित्र पालटलं. कारण विदर्भातील ६२ पैकी ४७ आणि मराठवाडातील ४६ जागांपैकी ४० विधानसभेच्या जागा महायुतीने जिंकल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीतील २६.१८ टक्क्यांच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेलं मताधिक्य २६.५६ इतकं किंचित जास्त राहिलं; तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ते काही प्रमाणात कमी होऊन १२.४४ टक्के इतकं राहिलं. लोकसभेला शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मताधिक्य १२.९५ टक्के इतके होते.

लोकसभा निवडणुकीत अत्यंत सुमार कामगिरी करणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीतील ३.६ टक्क्यांच्या तुलनेत ९.२४ टक्के मते मिळवली. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने लढवलेल्या ५९ जागांपैकी ४१ जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी ४१ जागांवर त्यांचा सामना हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत होता.

या जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात १३ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या मतांचा टक्कादेखील लोकसभा निवडणुकीच्या १६.९ टक्क्यांवरून आता जवळपास पाच टक्क्यांनी घसरला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १२.०५ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसची भाजपासोबत ७६ जागांवर थेट लढत झाली, ज्यापैकी ६२ जागांवर पक्षाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मताधिक्यदेखील कमी झाले आहे. लोकसभा निवडणुकीत १२.९५ टक्क्यांवरून हा आकडा १०.१९ टक्क्यांवर आला आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेशी झालेल्या थेट लढतींपैकी उद्धव सेनेला ३८ जागी पराभव पत्करावा लागला आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मताधिक्य लोकसभेच्या १०.२७ टक्क्यांवरून ११.२७ टक्के इतके वाढले आहे. पण, असे असले तरी अजित पवारांच्या पक्षासोबत थेट लढत झालेल्या ३६ पैकी २९ जागा शरद पवारांच्या पक्षाने गमावल्या आहेत.

हेही वाचा>> लाभार्थीकरण, धर्माची फोडणी आणि चमचमीत यश; गिरीश कुबेर यांनी सांगितली महायुतीच्या विजयाची ‘रेसिपी’!

महायुतीच्या विजयाची कारणे काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्राखाली ३० ते ३५ संघटनांनी केलेला जोरदार प्रचार, लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक हैं तो सेफ हैं’ मोहीम या घटकांच्या एकत्रित परिणामामुळे महायुतीला मोठा विजय मिळण्यास मदत झाली.

तसेच मतदारांची वाढलेली संख्या हेदेखील महायुतीसाठी फायदेशीर ठरले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महिला मतदारांमध्ये सहा टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे राज्यातील एकूण मतदानाचा टक्का ४.७ टक्क्यांनी वाढला. आकडे असेही सांगतात की, ज्या १२२ जागांवर मतदान पाच टक्क्यांनी वाढलेले आहे,अशा १०८ जागांवर महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकरी आणि महिलांनी सरकारवर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानले आहेत. शिंदे म्हणाले की, “लाडक्या बहि‍णींनी आणि शेतकर्‍यांनी आमच्या कामाचा सन्मान केला आहे. मी विधानसभेत आधीही सांगितले होते की, लोकांसाठी केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. त्यानुसार लाडक्या बहिणींनी व शेतकर्‍यांनी आम्हाला या निवडणुकीत पुन्हा त्यांचे आशीर्वाद दिले आहेत.”

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले लहान पक्ष आणि अपक्षांबद्दल बोलायचे झाल्यास, जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही शून्यावरून विधानसभा निवडणूकीत दोन टक्क्यांवर गेली. इतर पक्षांच्या मतांची टक्केवारी लोकसभेतील ११.२५ टक्क्यांवरून १३.८८ टक्क्यांवर पोहोचली. एकंदरीत या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतांचा वाटा कमी करणे हादेखील महायुतीच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग होता.

विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निकालांमधून लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास दिसून आला. प्रचारादरम्यान फडणवीसांनी अनेकवेळा मुस्लीम मतांचे एकत्रीकरण आणि ‘वोट जिहाद’ याबद्दल वक्तव्य केली होती, त्यामुळे महायुतीने आरामात बहुमताचा आकडा पार केल्यानंतर फडणवीसांनी विजयाचे श्रेय मोदींच्या ‘एक है, तो सेफ है’ या घोषणेला दिले.

मुस्लीम मतदारांनी काँग्रेसला नाकारलं

निवडणूक निकालानुसार, मुस्लीम लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात भाजपाला चांगला फायदा झाल्याचे दिसून येते. २० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम मतदार असलेल्या ३८ जागांवर भाजपाने चांगलीच प्रगती केली आहे. येथे पक्षाने २०१९ च्या ११ जागांच्या तुलनेत १४ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला अशा जागांवर मोठा झटका बसला असून, पक्षाने २०१९ च्या ११ जागांच्या तुलनेत अवघ्या पाच जागा जिंकल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीतील हा विजय अभूतपूर्व असल्याचे सांगत अजित पवारांनी मतदारांचे आभार मानले आहेत. सोबतच त्यांनी सत्ताधारी महायुतीची जबाबदारी वाढल्याचेदेखील म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी पराभव मान्य केला; पण…

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि इतर सहकारी पक्षांनी निवडणूक निकाल स्वीकारले आहेत. ठाकरे म्हणाले, “एक अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल; पण पर्याय नसल्याने मी तो स्वीकारला आहे. महाराष्ट्र माझ्याशी असे वागेल, असे मला वाटत नाही. मला आश्चर्य वाटते की, अशी लाट तयार करण्यासाठी सरकारने असे काय केले आहे… भाजपाचे माजी अध्यक्ष म्हणाले होते की देशात विरोधी पक्षच नसावेत, काही जण म्हणतात हा ईव्हीएमचा विजय आहे.”

Story img Loader