प्रदीप नणंदकर

लातूर : भाजपची दोन मते फोडून २०१९च्या निवडणुकीत महापौर झालेले विक्रांत गोजमगुंडे हे चांगल्या कामासाठी नेहमीच चर्चेत असतात. ३८ वर्षांचे गोजमगुंडे हे राजकारणात काही नवे घडवू शकतो, असा सकारात्मक विचार करणारे काँग्रेसचे नेते. शिक्षण बी.कॉम,, डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन असे झाले आहे. २०१२ मध्ये लातूर महानगरपालिकेत नगरसेवकपदी त्यांची पहिल्यांदा निवड झाली. त्यानंतर विविध प्रकारच्या सभापतीपदांवर त्यांनी काम केले. युवक काँग्रसचे सचिव म्हणून २००९ पर्यंत काम करणारे गोजमगुंडे यांची राजकीय कारकीर्द तशी स्वच्छता अभियानात केलेल्या कामातून अधिक चांगली झाली.

On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar on chhagan Bhujbal Yeola Assembly Election
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यासमोर येवला मतदारसंघ राखण्याचे आव्हान; शरद पवार भुजबळांच्या विरोधात आक्रमक का?
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?

हेही वाचा… केदार साठे : संस्थात्मक कामातून संघटनेला बळ

२०१९ मध्ये ते राज्यातील सर्वात तरुण महापौर होते. तत्पूर्वीच्या दोन महापालिकांच्या निवडणुकीत म्हणजे २०१२ व २०१७ या दोन्ही साली लातूर शहरात सर्वाधिक मताने निवडून येणारे नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे. त्यांना उत्कृष्ट नगरसेवक लायन्स क्लब लातूरद्वारा २०१८ साली सन्मानित करण्यात आले. त्यांच्या महापौरपदाच्या काळात भारत सरकारच्या वतीने शहर स्वच्छतेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल लातूर मनपास राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. २०१८ साली प्रभागात राबवलेल्या स्वच्छता अभियानास प्रेरित होऊन प्रभागातील दाम्पत्याने स्वतःच्या मुलीचे नाव स्वच्छता असे ठेवले. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील घेत गोजमगुंडे यांचे कौतुक केले.

हेही वाचा… भास्कर अंबेकर : राजकारणाला सामाजिक कार्याची जोड

कोविडकाळात ड वर्ग महानगरपालिकामधून राज्यात सर्वोत्तम कामगिरी लातूर नगरपालिकेने केली. एकही दिवस घरी न बसता विक्रांत गोजमगुंडे कार्यरत होते. पहिले सत्तर दिवस एकही करोनाबाधित रुग्ण नव्हता. मनपाचे स्वतःचे एकही हॉस्पिटल नसताना पंधराशे खाटाचे विलगीकरण केंद्र कार्यरत ठेवण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. देशातील पहिला कचऱ्यापासून कोळसा आणि वाफ निर्माण करणारा प्रकल्प मंजूर करण्यात आला. ज्यामुळे मनपाची वार्षिक चार कोटींची बचत होणार आहे. या सर्व कामात महापौर गोजमगुंडे यांचा मोलाचा वाटा होता. महिला बचत गटाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन निर्मिती प्रकल्प त्यांनी उभारला. ५००० फुटांपेक्षा अधिक इमारतींना सॅनिटरी नॅपकिन विघटन संयंत्र बंधनकारक करणारी राज्यातील पहिली मनपा ही लातूर ठरली. पूर्णवेळ राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत, इतरांना राजकारणात येऊन व्यवस्थेत बदल घडवून आणण्याचे आवाहन विक्रांत गोजमगुंडे करतात. काँग्रेसशी प्रामाणिक अशीही त्यांची लातूर जिल्ह्यात ओळख आहे.