Dahanu Assembly constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव आमदार विनोद भिवा निकोले हे पुन्हा एकदा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या डहाणू मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २०१९ साली निकोले यांनी पहिल्यांदा विजय मिळविला होता. यावर्षी निकोले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला आहे. ४९ वर्षीय निकोले हे भूमिहून आदिवासी मजूर कुटुंबातून येतात. २०१९ साली त्यांनी लोकांच्या समस्यांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. २०१९ साली भरलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे घर, गाडी काहीही नव्हते.

२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निकोले यांनी मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तसेच पुन्हा निवडून देण्यासाठी मतदारांना आवाहन केले. निकोले यांच्या प्रचार साहित्यामध्ये त्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे. शेतकरी आणि आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी सभागृहात कसा लढा दिला, याबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Devendra Fadnavis Nagpur Hometown
Devendra Fadnavis: मुंबईत स्वत:चं घर नसलेला मी एकमेव मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं

द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना विनोद निकोले म्हणाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता म्हणून मला अनेकजण मतदान करणारे आहेत, याची मला कल्पना आहे. पण असे अनेक मतदार आहेत, ज्यांना पक्षाची विचारधारा मान्य नाही, तरीही ते मला मतदान करतात. कारण माझे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व आहे. मागच्या पाच वर्षांत मी सर्वांसाठी काम केले. आमच्या भागात वीज, पाणी, रेशन, आरोग्य सुविधा, शाळा अशा मूलभूत सोयी-सुविधा मिळविण्यासाठीही आम्हाला झगडावे लागते.

हे वाचा >> Video: “मला भाजपावाल्यांनीच विनोद तावडेंबद्दल सांगितलं”, हितेंद्र ठाकूर यांची माध्यमांना माहिती; पैसे वाटल्याचा आरोप!

प्रचाराची शैली कशी होती?

विनोद निकोले यांनी मोठ मोठ्या राजकीय सभा घेण्याऐवजी गावागावात जाऊन छोटेखानी बैठका घेण्यावर भर दिला. अनेक सभांना तर मंच किंवा कार्यकर्तेही नव्हते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या नेत्या वृंदा करात आणि अशोक ढवळे यांनी मागच्या आठवड्यात निकोले यांच्यासाठी सभा घेतली. सीपीआय (एम) पक्षाकडून डहाणू व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर मध्य या दोन मतदारसंघात निवडणूक लढवली जात आहे. पण या ठिकाणी त्यांची मविआबरोबर मैत्रीपूर्ण लढत होत आहे.

डहाणू विधानसभा मतदारसंघात सीपीआय (एम) पक्षाने आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या इतर संस्थांनी केलेल्या कामावर पक्षाचा प्रचार अवलंबून आहे. आदिवासी समाजासाठी सेवाभवी संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या एआकेएस आणि कष्टकरी संघटनेचे काम निकोले यांना फायदेशर ठरणार आहे. १९७५ साली एआयकेएस या संघटनेच्या माध्यमातून वारली या आदिवासी संस्कृतीला जतन करण्याचे काम शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर यांनी केली. डहाणू मतदारसंघातील अनेकांनी विनोद निकोले यांच्या सभेदरम्यान सांगितले की, आम्ही त्यांनाच मतदान करणार. तसेच जमीन आणि जंगल हक्कांसाठी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या संघटनांचाही विनोद निकोले यांनाच पाठिंबा आहे.

डहाणू विधानसभा मतदारसंघावर बरीच वर्ष काँग्रेसचे वर्चस्व राहिले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १९७८, २००९ आणि २०१९ असा तीनवेळा याठिकाणी विजय मिळविला होता. २०१९ साली विधानसभा निवडणुकीत विनोद निकोले यांनी भाजपाच्या उमेदवाराचा ४,७०० मताधिक्याने विजय झाला होता. त्यावेळी काँग्रेस आणि संयुक्त राष्ट्रवादीने विनोद निकोले यांना छुपा पाठिंबा दिला होता. यावेळी विनोद निकोले यांचा सामना भाजपाच्या विनोद मेढा यांच्याशी होत आहे.

डहाणू मतदारसंघ मुंबईपासून १५० किमी अंतरावर असून गुजरातच्या सीमेवर आहे. डहाणू शहरातून भाजपाला बऱ्यापैकी पाठिंबा आहे. तर ग्रामीण भाग आणि विशेषतः तलासरी तालुक्याती आदिवासीबहुल भागातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा मिळतो.

वाढवण बंदराचा विषय चर्चेत

डहाणू मतदारसंघाला समुद्रकिनाराही लाभला आहे. डहाणूच्या शेजारी असलेल्या पालघर विधानसभेत वाढवण बंदराचा प्रकल्प येत आहे. मच्छिमार समाजाकडून या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. सत्तेत आलो तर वाढवणचा प्रकल्प रद्द करू, असे आश्वासन शिवसेना (ठाकरे) पक्षाने दिले आहे. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते.

डहाणूमधील भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश राजपूत म्हणाले, “वाढवण प्रकल्पाचा विषय फारसा चिंतेचा ठरणार नाही. या प्रकल्पामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, याची सर्वांना कल्पना आहे. आम्ही सरकारच्या योजना आणि जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. मतदारांना सांगण्यासाठी आमच्याकडे हेच आहे.” निकोले यांनी मात्र जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा विरोध केला आहे. तसेच मविआने दिलेल्या आश्वासनांचाही त्यांनी विरोध केला. इतर आश्वासनांपेक्षा रोजगार देण्याबाबतची घोषणा झाली पाहीजे. निकोली यांनीही वाढवण बंदर प्रकल्पाचा विरोध केला आहे. तसेच मतदारसंघात शाश्वत विकास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.