मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मैतेई आणि कुकी समुदायामध्ये पुन्हा संवादाची सुरुवात करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे आणि मणिपुरी नागरिकांना आत्मविश्वास आणि सुरक्षितता वाटेल अशी परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे, अशी भूमिका मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी व्यक्त केली. मणिपूर राज्यात ३ मे रोजी कुकी आणि मैतेई समुदायामध्ये हिंसाचार उसळल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच द इंडियन एक्सप्रेसला सविस्तर मुलाखत दिली. मणिपूरमधील हिंसाचाराचे वर्णन वांशिक संघर्ष नसल्याचे सिंह यावेळी म्हणाले. तसेच अमलीपदार्थ आणि बेकायदा स्थलांतराला रोखण्यासाठी जी लढाई सरकारने सुरू केली, त्यामुळेच हिंसाचार सुरू झाला, असा दावाही त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मणिपूर उच्च न्यायालयाने मैतेई समुदायाचा अंतर्भाव अनुसूचित जमातीमध्ये करण्याचा निर्णय दिल्यामुळे राज्यात हिंसाचाराची सुरुवात झाली, अशी एक शक्यता वर्तविली जात होती. मात्र, यात तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री सिंह म्हणाले. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरकारने कोणताही तसा आदेश काढलेला नाही, त्यामुळे कुकी समुदायाला राग येण्याचे कोणतेही कारण नाही.
हे वाचा >> मणिपूर हिंसाचार : कुकी आणि मैतेई हे समाज नेमके कोण आहेत ?
दोन समुदायांत संवाद प्रस्थापित करण्याला प्राधान्य
तीन महिन्यांपूर्वी शांतता समितीने राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम सुरू केले असल्याचे सांगताना सिंह म्हणाले की, हिंसाचारामुळे ज्या समुदायाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, ज्यात मैतेई आणि कुकीदेखील आले, त्यांच्यात सर्वात आधी संवाद सुरू करणे याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. ज्या लोकांना हिंसाचाराचा फटका बसला, त्यांच्याशी काही जणांच्या माध्यमातून मी संवाद सुरूही केला आहे. राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणणे माझे कर्तव्य आहे.
हिंसाचार सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारला तणाव निर्माण होतोय, याचा अंदाज का बांधता आला नाही? असा प्रश्न विचारला असता सिंह म्हणाले की, ज्या दिवशी आदिवासी समुदायाकडून एकता मोर्चा (solidarity march) काढण्यात आला होता, तेव्हाच पोलिस महासंचालकांना मी असुरक्षित जिल्ह्यांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले होते. तसेच ३ मे रोजी उसळलेल्या हिंसाचाराबाबत केंद्र सरकारने न्यायिक चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे या प्रकरणावर मी अधिक बोलू इच्छित नाही.
“मी आणि राज्यपाल मॅडम त्या दिवशी दोघेही उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यात होतो. मी आता ३ मे रोजीच्या घटनेवर टीका किंवा निषेध करू इच्छित नाही. एकता मोर्चामुळे मी असुरक्षित जिल्ह्यांमध्ये सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले होते. पण, दुर्दैवाने पोलिस महासंचालकांनी चुराचंदपूर जिल्ह्याला सुरक्षा पुरविली नाही, हे मला नंतर कळले. त्यांनी कांगपोकपी आणि नोनी जिल्ह्यात सुरक्षा पुरविली. नोनी जिल्ह्यात कुकी समुदायच नाही; तपासादरम्यान ही माहिती समोर आली. आता यावर मी अधिक बोलू इच्छित नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्थापन केलेल्या आयोगासमोर याबाबतचे पुरावे आले आहेत”, असेही मुख्यमंत्री सिंह म्हणाले.
हे वाचा >> कुकी समुदायाला शांत करण्यासाठी मणिपूर सरकारचा मोठा निर्णय; कुकी-मैतेई संघर्ष थांबणार?
केंद्र सरकारचा माझ्यावर पूर्ण विश्वास
केंद्र सरकारकडून नव्या पोलिस महासंचालकांची, सुरक्षा सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि केंद्रीय मंत्रीही राज्याचा वारंवार दौरा करत आहेत. राज्यातील हिंसाचार नियंत्रणात आणण्यात तुम्ही (मुख्यमंत्री सिंह) सक्षम नाही, असे केंद्राला वाटत आहे का? असा प्रश्न विचारला असता सिंह म्हणाले की, केंद्र सरकारचा मला पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांचा माझ्यावर विश्वासदेखील आहे. जर केंद्राचा माझ्यावरील विश्वास कमी झाला असता तर त्यांनी इतर पर्याय याआधीच निवडले असते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्र्यांनी मला सांगितले, “हिंमत न हरता अधिक मजबुतीने या संकटाचा सामना करा.” त्यांच्या या शब्दांनी मला पुन्हा नव्या ताकदीने उभे राहण्याची प्रेरणा दिली. कधी कधी मी विचलित आणि निराश होतो, पण केंद्रीय गृहमंत्री मला नेहमीच विश्वास देत असतात.
मुख्यमंत्री सिंह यांच्या निवासस्थानावर मध्यंतरी हल्ला करण्यात आला होता. मतदारसंघात तुमची पकड ढिली झाली आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जमावाला माझ्या घरापर्यंत पोहोचू दिले गेले नाही. तसेच ही घटना राजकीय असून विरोधी पक्षांचा त्यात हात असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.
विवस्त्र धिंड काढलेल्या महिलांना मैतेईंनीच वाचविले
मध्यंतरी कुकी समुदायातील दोन महिलांचा विविस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर मुख्यमंत्री सिंह म्हणाले, “त्या दोन महिलांना वाचवून त्यांना परत घरी सुरक्षित पोहोचवणाऱ्या मैतेई लोकांचेही कौतुक केले गेले पाहिजे. त्या दोन महिलांच्या घरातील दोन पुरुषांची हत्या केली गेली. ज्या समुदायातील लोकांनी हा गुन्हा केला, त्याच समुदायातील लोकांनी त्यांचे प्राण वाचविले. तसेच या घटनेत ज्या लोकांनी विकृत गुन्हा केला, त्यांचाही मी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच ज्या लोकांनी त्या महिलांना वस्त्र देऊन सुरक्षितपणे घरी पोहोचवले, त्यांचेही आपण कौतुक केले पाहिजे. ही घटना समोर आल्यानंतर आरोपींना पोलिसांनी पकडलेले नाही, तर मैतेई समुदायातील लोकांनीच घराबाहेर पडून आरोपींना शोधले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.”
आणखी वाचा >> ‘आमच्या ‘कोम’ समुदायाला वाचवा’, मणिपूरच्या हिंसाचारावरून मेरी कोम यांचे अमित शहा यांना पत्र
मी मैतेई असल्यामुळे माझ्यासमोर अडचण
तुम्ही पीडित कुटुंबीयांना भेट का नाही दिली? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, “मला कुकी समुदायातील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार द्यायचा होता, पण त्यासाठी मला परवानगी दिली गेली नाही. पण, त्यावेळी परिस्थिती तशी होती. तणावाची परिस्थिती असल्यामुळे मला लक्ष्य केले गेले असते आणि त्याचे खापर कुकी समुदायावर फुटले असते. शेवटी कोण खरे आणि कोण खोटे हे देवच ठरवेल, असे मला कधी कधी वाटते. कुकी समुदायातील कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखल्यामुळे मी मैतेई समुदायातील पीडितांचीदेखील भेट घेणे मुद्दामहून टाळले. मी जर मैतेईंची भेट घेतली असती तर कदाचित यातून आणखी चुकीचा अर्थ काढला गेला असता. लोक म्हणाले असते, “बघा, मैतेई आहे म्हणून हा मैतेईंनाच भेटला.” ही कोंडीच माझ्यासमोरची सर्वात मोठी अडचण ठरली आहे. पण, मी मध्यंतरी दोन्ही समुदायांसाठी उभारलेल्या मदत शिबिराला भेट देऊन पीडितांची विचारपूस केली.”
सिंह पुढे म्हणाले की, २०१८ साली मुक्त संचार व्यवस्था सुरू करण्यात आली, ज्यामुळे आदिवासी जमातींना भारत – म्यानमार देशांच्या सीमेमध्ये व्हिसाशिवाय १६ किमीपर्यंत प्रवास करण्याची मुभा मिळाली. अशा पद्धतीने प्रवास करण्याची परवानगी द्यायला नको होती. “पलीकडील देशातील नागरिकांना आपल्या देशाच्या भूमीत येऊन १६ किमीपर्यंत प्रवास करण्याची मोकळीक यामुळे मिळाली. जर ते इथे येऊन कायमचे स्थायिक झाले की परत गेले, याची नोंद कोण ठेवणार? जर ते परत गेलेच नसतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले”, असेही मुख्यमंत्री सिंह म्हणाले.
हेदेखील वाचा >> Manipur Violence : मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड; संपूर्ण प्रकरण काय आहे?
मैतेई समुदायातील मुख्यमंत्री असल्यामुळे कुकी आणि इतर जमातींच्या हक्कांचं सरंक्षण करण्यासाठी काय करणार? असा प्रश्न विचारल्यानंतर सिंह म्हणाले, “माझ्या अंतर्गत प्रशासनात कुकी अधिकारी आहेत. तसेच मी या आधीही कुकी समुदायासाठी विविध निर्णय घेतले आहेत. ब्रिटिश काळात कुकींनी केलेल्या संघर्षाचे स्मरण करण्यासाठी “कुकी रायजिंग डे”ची घोषणा सरकारने केली आहे. मणिपूरमधील सर्व कुकी समुदायाचे माझ्यावर प्रेम आणि विश्वास आहे. उलट बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांना मी पुन्हा त्यांच्या देशात धाडणार असल्याच्या भीतीने त्यांनीच माझ्याविरोधात द्वेष पसरविला.”