दिगंबर शिंदे

सांगली : माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असताना ही केवळ अफवा असून कोणतीही वेगळी भूमिका आपण घेणार नसल्याचा खुलासा डॉ. कदम यांनी बुधवारी अंकलखोपमध्ये झालेल्या एका कार्यक्रमावेळी केला. असे असले तरी गेल्या काही दिवसांतील त्यांचा घटनाक्रम मात्र निराळीच दिशा व्यक्त करत आहे.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
Canada News
Canada : चिथावणीखोर वक्तव्याबद्दल कॅनडातील ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागताच माजी राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या भाजप प्रवेशाची जिल्ह्यात चर्चा जोरदार सुरू झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत दौरा नसताना भारती विद्यापीठाला दिलेली भेट आणि या भेटी दरम्यान, ‘विश्वजित कदम आमचेच’ असल्याचे केलेेले वक्तव्य अधोरेखित केले जात होते. तसेच कडेगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये स्वत: कदमांनी हे सरकारही आपलेच असून तेथेही आपले मित्र असल्याने विकास कामांना निधी कमी पडणार नसल्याची दिलेली ग्वाहीही याचेच संकेत देत होती.

डॉ. कदम महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आ.जयंत पाटील यांनी त्यांचे फारसे महत्त्व वाढणार नाही याची कायम दक्षता घेतली होती. यामुळे उघड नसली तरी खासगीमध्ये डॉ. कदम यांनी नाराजीचा सूर आळवला होता. याशिवाय सासरे अविनाश भोसले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या कोठडीमध्ये आहेत. त्यांच्या सुटकेसाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे. भारती विद्यापीठाचा राज्यभर असलेला पसाराही सांभाळण्याची जबाबदारी असल्याने सत्तेविना डॉ.कदम यांची कोंडी होत असल्याचे पदोपदी जाणवते.

भाजपचीही डॉ. कदम यांना अनुकूलता दिसून येते. स्व. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीवेळी अखेरच्या क्षणी संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी मागे घेऊन भाजपने त्यांना पुढे चाल दिली होती. तर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेला उमेदवारी देऊन तुल्यबळ उमेदवार मैदानात नसेल याचीही व्यवस्था भाजपकडून झाली होती. यावरून डॉ.कदम यांना भाजप प्रवेशासाठी पायघड्या घालण्याची तयारी अगोदरपासून दिसत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

कदमांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना त्याबाबत त्यांनी खुलासा करण्यासही गेले अनेक दिवस विलंब केला. काँग्रेसचे विधिमंडळ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या साक्षीने आपण भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचा खुलासा डॉ. कदम यांनी केला असला तरी थोरातांनी त्यांच्याकडे पाहात ’हा बिलंदर गडी आहे, तोच इतरांना सांभाळून घेतो,’ असे सांगत त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला गती दिली आहे.