हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यासाठी भाजपा, काँग्रेस आणि नव्याने उतरलेल्या आम आदमी पक्षाकडून ( आप ) जोरदार प्रचार केला जात आहे. शनिवार ( ५ नोव्हेंबर ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केलं. तसेच, कमळाच्या चिन्हाला मतदान केलं तर, मला आशीर्वाद मिळेलं, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदी सोलन येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. “भाजपाचा उमेदवार कोण आहे, हे आठवण्याची गरज नाही. फक्त कमळ चिन्ह लक्षात ठेवा. कमळाच्या फूलाला केलेलं मतदान आशीर्वादाच्या रुपाने मला मिळेलं. दिल्लीत मोदी असतील तर, येथे सुद्धा मोदींना मजबूत बनवायला नको का?,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा : “तुम्ही जगात लोकप्रिय, कारण गांधी…”, अशोक गेहलोतांचा पंतप्रधानांना खोचक टोला; सचिन पायलट यांचाही घेतला समाचार

पंतप्रधान मोदींनी राज्यात प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या काँग्रेसवरही टीका केली आहे. “काँग्रेसला कधीही छोट्या राज्यांमध्ये स्थिर सरकारे नको होती. काँग्रेसने सत्तेवर आल्यावर फक्त आपला विचार केला. समाजाला तोडण्याचे काम त्यांनी केलं. केंद्रात भाजपाचे स्थिर सरकार सत्तेत आल्यापासून, भ्रष्टाचार, राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात काम करणाऱ्या शक्तींशी लढा सुरु आहे. त्यामुळे ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित आहे,” असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

हेही वाचा : मंत्रीपदावरून गच्छंती झालेले भाजपा नेते सुरतची जागा कायम राखणार?

“भ्रष्टाचार, अस्थिरता, स्वार्थ आणि घराणेशाही म्हणजे काँग्रेस आहे. तीन दशकात काँग्रेसने देश उद्ध्वस्त केला. काँग्रेसने तरुण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन फसवणूक केली. परंतू, केंद्रात भाजपाचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान सुधरण्यासाठी मदत केली,” असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

Story img Loader