प्रस्थापितांची शेती पडीत ठेवून मतदारांनी कमळ शेती फुलविली, भाजपच्या पदरात भरभरून मतदान

चारही मतदारसंघात युतीला मिळालेली मते म्हणजे मतदारांनी आता कमळ शेतीचा पर्याय स्वीकारल्याचे स्पष्ट होते. ७० टक्के मतदान म्हणजे विक्रमीच.

Wardha District Assembly Election Result,
प्रस्थापितांची शेती पडीत ठेवून मतदारांनी कमळ शेती फुलविली, भाजपच्या पदरात भरभरून मतदान (image credit – loksatta team/Pankaj Rajesh Bhoyar file pic fb/loksatta graphics)

वर्धा : चारही मतदारसंघात युतीला मिळालेली मते म्हणजे मतदारांनी आता कमळ शेतीचा पर्याय स्वीकारल्याचे स्पष्ट होते. ७० टक्के मतदान म्हणजे विक्रमीच. १९६२ ते काल झालेल्या निवडणुकीत मतदानाचा हा आकडा सर्वोच्च ठरला आहे. पारंपरिक शेतीत फारसा फायदा दिसत नाही म्हणून पिकपालट करण्याचे चाणाक्ष शेतकरी ठरवितो आणि फायद्यात येतो. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बसलेला शिक्का पुसून भाजपचा बालेकिल्ला अशी नवी ओळख या गांधी जिल्ह्यास मतदारांनी दिली आहे. चारही मतदारसंघात मिळून चार लाखांवर मते कमळास पडली. तीन लाखांत काँग्रेस आघाडी आटोपली. जवळपास आठ वर्षे सत्तेबाहेर राहूनही काँग्रेस उमेदवार प्रस्थापितांचे ठरले. त्यांनी भरलेले प्रतिज्ञापत्र हेच त्याची साक्ष ठरावे.

दिमाखदार माडी, मजले असलेल्या आघाडीच्या उमेदवारांपेक्षा भाजपचे वारसा नसलेले उमेदवार पसंतीस उतरले. देवळी त्याचे एक मोठे उदाहरण ठरावे. भाजपचे राजेश बकाने विरुद्ध पाच वेळा आमदार राहिलेल्या रणजित कांबळे यांच्यात सामना. येथेच आपण जिंकत नसल्याचे शल्य उराशी असलेल्या भाजप धुरीणांनी सर्व तो बंदोबस्त करीत कांबळेंना पण पाडता येते, हे दाखवून दिले.

akola Congress MP Imran Pratapgarhi criticized corrupt Mahayuti government
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार, काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांची खरमरीत टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?

हेही वाचा – धार्मिक ध्रुवीकरणाची भाजपची खेळी यशस्‍वी

वर्ध्यात डॉ. पंकज भोयर यांनी झपाट्याने विकास केल्याचा प्रचार झाला. पण मग भ्रष्टाचारचेही आरोप चिकटले. पण ते घराणेशाहीच्या आरोपापुढे फिके ठरले. काँग्रेसचे शेखर शेंडे यांचा चांगली प्रतिमा नसल्याचा सातत्याने प्रचार झाला. तो यावेळी पण करण्यात आला. आर्वीत सुमित वानखेडे म्हणजे विकासाचे नवे पर्व हा प्रचार भाजपच्या पथ्यावर पडला. सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम जिल्ह्यात घडला. राज्यात उत्तम मतदारसंघ करून दाखवेल, ही त्यांची हमी आर्वीकरांनी विश्वसनीय मानली. कारण त्यांच्या पाठीशी असणारी ताकद. खासदार पत्नी मयूरा अमर काळे यांची उमेदवारीच वादग्रस्त. ज्या कागद नं पाहता चार ओळीचे भाषण करू शकत नाही, त्यांचे विधिमंडळात कसे चालणार, हा क्षितिजा सुमित वानखेडे यांचा सवाल बिनतोड ठरला. निकाल नामोहरम करणारा.

हेही वाचा – महाविकास आघाडी एकत्र लढल्याशिवाय राज्यसभा, विधान परिषदेत प्रतिनिधित्व कठीण

हिंगणघाटमध्ये समीर कुणावार यांनी हॅटट्रिक करीत या मतदारसंघात इतिहास रचला. आघाडीचे अतुल वांदिले यांना स्वपक्षीयांची साथ मिळालीच नाही तर बंडखोरी सहन करावी लागली. प्रस्थापित नसलेला हा आघाडीचा उमेदवार भाजपच्या संघटनात्मक वज्रमुठीचे प्रहार झेलण्यास असमर्थ ठरला. येथेच राष्ट्रवादी जिल्ह्यात भक्कम आहे. त्यालाच तडे गेले आणि कमळ भरभरून बहरले. पुढे काय राजकारण करावे, अशी चिंता निर्माण करणारा सवाल भाजपने काँग्रेस आघाडीपुढे उभा करून ठेवला आहे. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत आघाडीस बळ देणाऱ्या मतदारांनी या निवडणुकीत भाजपच्या पदरात भरभरून कमळे ओतली आहे. इतका तत्पर पिकपालट प्रथमच दिसून आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wardha district assembly election result bjp supremacy congress defeat arvi hinganghat deoli ranjit kamble sumit wankhede bjp pankaj bhoyar bjp print politics news ssb

First published on: 24-11-2024 at 13:01 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या