वर्धा : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात चूरशीच्या लढती झाल्याने काहींना हॅटट्रिक तर एकाची डबल हॅटट्रिक साध्य होणार की हुकणार असा प्रश्न चर्चेत आला आहे. वर्धेतून भाजपचे डॉ. पंकज भोयर, हिंगणघाटमधून भाजपचे समीर कुणावार हे तिसऱ्यांदा उभे असून ते हॅटट्रिक तर देवळीतून काँग्रेस आमदार रणजित कांबळे हे सहाव्यंदा उभे राहून डबल हॅटट्रिक साधण्याचा मनसुबा ठेवून आहेत.

वर्ध्यात डॉ. भोयर तर हिंगणघाट येथे कुणावार दोन वेळा विजयी झालेत. आमदार कांबळे हे सलग पाच वेळा विजयी झालेत. त्यांना आता विजयी होवू द्यायचेच नाही असा निर्धार ठेवत भाजपने राजेश बकाने यांना सर्व ती रसद दिली. पॉकेटबाज म्हटल्या जाणाऱ्या नेत्यांवर नजर ठेवली. काहींना हद्दपार केले. स्वतः बकाने म्हणतात की पक्षनेत्यांनी सर्व ती मदत दिली. इतिहास घडणार, असे ते म्हणतात. तर हिंगणघाट येथे समीर कुणावार यांना विजयाची खात्री आहे. माझा विजय एकतर्फी असे ते म्हणतात. तर याठिकाणी आघाडीचे अतुल वांदिले म्हणतात युवा लोकं आमच्या बाजूने असून मतदानातून तसा प्रतिसाद मिळाला, अशी त्यांना खात्री आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
The Nagpur Bench of Bombay High Court ruled on girls entitlement to maintenance
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दक्षिण-पश्चिम’मध्ये मतदानात तीन टक्क्यांची वाढ

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यात वाढलेल्‍या मतदानावर दावे-प्रतिदावे

आर्वीत दोन्ही उमेदवार प्रथमच रिंगणात आहे. भाजपचे सुमित वानखेडे विरुद्ध खासदार पत्नी मयुरा अमर काळे यांची लढत राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली. मतदानाचा वाढता टक्का आघाडीस या मतदारसंघातून कायमचा हद्दपार करणारा ठरेल, अशी खात्री वानखेडे देतात. या मतदारसंघात खासदार पिता दिवं. डॉ. शरद काळे यांनी हॅटट्रिक साधली होती. आता मात्र काळे घराण्याचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक ठरणार. शेवटच्या क्षणात दादाराव केचे यांच्यावर आलेला पक्ष विरोधाचा ठपका त्यांचेही भविष्य ठरविणार. पराभवाची हॅटट्रिक करणारे काँग्रेसचे शेखर शेंडे यावेळी चौथ्यांदा रिंगणात आहे. विजयी होणारच असां दावा ते करतात. कारण आघाडीची लोकसभा निवडणुकीत बनलेली हवा कायम असल्याचे ते सांगतात. तर निवडणुकीच्या सर्व तंत्रात वाकबगार अशी ओळख असलेले भाजप उमेदवार डॉ. पंकज भोयर यांना ही निवडणूक सोपी वाटत आहे. राज्यात युतीला कौल मिळणार व भोयर मंत्री होणार, असे भोयर समर्थक बोलतात. अपक्ष डॉ. सचिन पावडे हा एक्स फॅक्टर आहेच. मात्र सट्टा बाजार युती दोन तर आघाडी दोन असे सांगत असल्याचे यावर विश्वास ठेवून असणारे काही कार्यकर्ते बोलतात.

Story img Loader