BJP leader Vinod Tawde: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रात यंदा अटीतटीची लढत होईल, असा अंदाज अनेक जण व्यक्त करत असताना विनोद तावडे यांना मात्र महायुती सर्वाधिक जागा घेऊन विजय मिळवेल असे वाटत आहे. द एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत त्यांचे निरीक्षण मांडले. लोकसभा निवडणुकीत दलित मतपेटी दूर गेली होती, मात्र यावेळी या मतांना पुन्हा आमच्याकडे आणण्यात यश येईल असे ते म्हणाले. विनोद तावडे यांची मुलाखत प्रश्नोत्तराच्या स्वरुपात खालीलप्रमाणे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्र. यंदा तीन-तीन पक्ष असलेल्या दोन आघाड्या, काही छोटे पक्ष आणि अपक्षांमध्ये यावेळी निवडणूक होत आहे. दरम्यान, भाजपाची सर्वात मोठी ताकद काय?

तावडे : प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ देणाऱ्या योजना आखून आम्ही राजकारणाला व्यवस्थित हाताळले आहे. अप्रत्यक्ष लाभात रस्ते, रेल्वे, मेट्रो, पाण्याचे व्यवस्थापन आणि शेतीसाठी दिलेल्या सुविधांचा उल्लेख होतो. तर प्रत्यक्ष लाभात लाडकी बहीण योजना, किसान सन्मान निधी अशा योजनांचा समावेश होतो.

हे वाचा >> “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय”, प्रतिभा पवारांच्या हातातील फलकाने वेधलं बारामतीकराचं लक्ष

प्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत काँग्रेसच्या काळातील योजनांवर टीका केली, तर भाजपा कल्याणकारी योजनेवर प्रचारात भर देत असताना हा विरोधाभास नाही का?

तावडे : नाही, अजिबात नाही. आम्ही थेट खात्यात लाभ वितरीत करणाऱ्या विकास योजनांमध्ये समतोल राखला आहे.

प्र. विरोधकांच्या आघाडीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. या दोन नेत्यांशिवाय महायुतीत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान मिळेल का?

तावडे : शरद पवार यांनी आमच्याबरोबर कधीही निवडणूक लढवलेली नाही, त्यामुळे त्यांची आम्हाला चिंता नाही. शिवसेना आमच्याबरोबर अनेक वर्ष आहे. पण, २०१४ मध्ये त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविली. २०१४ साली आम्हाला १२३ जागा मिळाल्या. तसेच शिवसेनेला ६० च्या आसपास जागा मिळाल्या. शिवसेना बरोबर नसतानाही आम्हाला १२० चा आकडा पार करता आला. मागच्या १० वर्षात भाजपाने केलेला भ्रष्टाचारमुक्त कारभार, विकासाचे राजकारण आणि थेट लाभ हस्तांतरीत करणाऱ्या योजनांमुळे यावेऴी आमच्या मतांमध्ये अधिकची भरच पडेल.

प्र. भाजपा मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे?

तावडे : मराठा आरक्षणासाठी कोणतेही आंदोलन केले तरी त्याचा चळवळीला निश्चितच फायदा होणार आहे. पण, मनोज जरांगे पाटील हे भाजपाच्या विरोधात का आहेत? याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे. मराठा आरक्षणाच्या इतिहासावर जर नजर टाकली तर भाजपा हा नेहमीच मराठा आरक्षणाच्या बाजूने राहिलेला आहे. २०१४ साली भाजपा सत्तेत असताना आम्ही मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण दिले. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवता आले नाही.

प्र. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आमचे आरक्षण संपून जाईल, अशी ओबीसींमध्ये भीती आहे, याबद्दल काय वाटते?

तावडे : भाजपाने जेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिले होते, ते ओबीसी आरक्षणाच्या व्यतिरिक्त दिले होते.

प्र. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २८ जागांपैकी केवळ नऊ ठिकाणी विजय मिळविला, याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल?

तावडे : लोकसभा निवडणुकीत आम्हाला निश्चितच कमी जागा मिळाल्या असल्या तरी आमच्या मतदानाची टक्केवारी फक्त ०.०३ टक्क्यानेच कमी झाली आहे. हेच मतदान यावेळीही आम्हाला मिळाले तरी आम्ही जिंकू शकतो, कारण यावेळी एमआयएम, वंचित, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमधील बंडखोर अपक्षांमुळे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणार आहे.

महायुतीला फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पर्धा मिळू शकते. दुसरे म्हणजे, लोकसभेत अनेकांनी मतदान करणे टाळले. आपण मतदान नाही केले तरी भाजपाचा विजय होणारच आहे, असा अनेकांचा समज होता. आता या वेळी हे मतदार सावध झाले आहेत, त्यामुळे यावेळी तीन ते चार टक्के अधिक मतदान झालेले पाहायला मिळेल.

प्र. २०१९ साली भाजपाने २८८ पैकी १६३ जागा लढल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपा केवळ १५२ जागा लढवत आहे.

तावडे : महायुतीमध्ये तीन पक्ष असल्याकारणाने आम्हाला तडजोड करावी लागली.

प्र. लोकसभा निवडणुकीत दलित मते इंडिया आघाडीच्या पारड्यात पडल्यामुळे भाजपाला फटका बसला, यावेळी तुम्हाला काय वाटते?

तावडे : भाजपा जर सत्तेत आली तर संविधान बदलले जाईल, असा अपप्रचार काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत केला आणि त्याचा त्यांना लाभ मिळाला. आम्हाला दलित समाजाचा मोठा पाठिंबा आहे. आम्ही त्यांना समजावून सांगत आहोत की, २०१४ आणि २०१९ साली आम्ही बहुमताने सत्तेत असतानाही संविधान बदलले नव्हते. मला वाटते, यावेळी दलित समाजाला आमचे म्हणणे पटेल.

तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेबाबत केलेल्या विधानामुळे ओबीसी अधिक चिंतेत आहेत. जातनिहाय जनगणना झाली तरी ओबीसींमधील काही जाती आरक्षणाबाहेर जातील, अशी त्यांना भीती वाटते.

प्र. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विधानसभेसाठी भाजपाबरोबर एकत्र येऊन काम करत आहे. कशापद्धतीने सुरू आहे काम?

तावडे : लोकांनी बाहेर पडून मतदान करावे एवढेच संघ लोकांना सांगत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, असा संघाचा प्रयत्न आहे, ज्यामुळे त्याचा लाभ आपसूकच भाजपाला मिळेल.

प्र. पण, बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, अशा घोषणा का दिल्या जात आहेत? भाजपाला असुरक्षितता का वाटते?

तावडे : या घोषणा फक्त परिस्थितीची जाणीव करून देत आहेत. राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत, त्यामुळेच पंतप्रधान मोदी एक है तो सेफ है, अशी घोषणा देत आहेत. आम्ही मतदारांना एकत्र येण्याचे आवाहन करत असून महाराष्ट्राच्या विकासासाठी मतदान करावे, असे सांगत आहोत.