एकीकडे अनेक राज्यांमधील प्रतिस्पर्धी पक्षांचे माजी मुख्यमंत्री, आमदार, खासदार आदी बडे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत असताना, पश्चिम बंगालमध्ये मात्र नेतेमंडळी भाजपा सोडून अन्य पक्षांमध्ये जाताना दिसत आहेत. गेल्या एकाच आठवड्यात भाजपाच्या एका आमदारानं व एका खासदारानं पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी अधिकृतरीत्या भाजपाला ‘राम राम’ ठोकला नसला तरी अलिपूरदूरच्या लोकसभेच्या जागेवरून उघड नाराजी व्यक्त केली आहे. संदेशखाली प्रकरणानंतर अडचणीत आलेल्या तृणमूल काँग्रेससाठी भाजपाच्या नेत्यांचं पक्षांतरण एक दिलासा देणारी बाब ठरत आहे. विशेष म्हणजे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प. बंगालला भेट देत अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं व संदेशखालीतील पीडितांची भेट घेतली, त्याच मुहूर्तावर भाजपामधील नेत्यांनी विरोधी पक्षाला जवळ केल्याच्या घटना घडल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा