पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार बायरन बिस्वास यांचा २२९८० मतांनी विजय झाला आहे. हा मतदारसंघ अगोदर तृणमूल काँग्रेसकडे होता. मात्र पोटनिवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात मतं दिल्यामुळे हा निकाल म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासाठी चांगलाच धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

तृणमूलच्या देबाशिस बॅनर्जी यांचा पराभव

सागरदिघी मतदारसंघातून २०२१ साली तृणमूलच्या सब्राता सहा यांनी दणदणीत विजय मिळवला होता. येथे ते ५० हजारपेक्षा जास्त मताधिक्यांनी विजयी झाले होते. मात्र डिसेंबर २०२२ मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. म्हणूनच येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. या जागेसाठी तृणमूलने देबाशिस बॅनर्जी यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने या जागेवर बिस्वास यांना तिकीट दिले होते.

assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
शहरापेक्षा नागपूर ग्रामीणमध्ये चुरस अधिक, कुठे बंडखोरी, तर कुठे प्रस्थापितविरोधी लाट
Mulik joins Tingre for campaign in Wadgaon Sheri seat
आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार !
maharashtra assembly poll 2024 rajendra raut and dilip sopal supporters clash barshi assembly elections
बार्शीत राजेंद्र राऊत – सोपल गटात गोंधळ; दोन्ही गटांचे आरोप-प्रत्यारोप, तणाव

हेही वाचा >> त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची सत्ता कायम? मेघालयमध्ये एनपीपी आघाडीवर

मुस्लीम मतदारांचे काँग्रेसला मतदान

ही जागा जिंकण्यासाठी तृणमूल काँग्रेसने कसून प्रचार केला होता. विशेष म्हणजे येथे ममता बॅनर्जी यांच्यादेखील सभा झाल्या होत्या. मात्र डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार वरचढ ठरला. या मतदारसंघात जवळपास ६३ टक्के मुस्लीम मतदार आहेत. हाच मुस्लीम मतदार २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या बाजूने होता. मात्र आता मतदारानांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांना जवळ केल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला मदत केली. काँग्रेस आणि भाजपात छुपी युती होती. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ही छुपी युती उघड झाली आहे,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

हेही वाचा >> Meghalaya Election 2023 : कोनराड संगमांची स्वबळावर निवडणूक लढण्याची रणनीती यशस्वी; एनपीपी दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार

काँग्रेसला मत म्हणजे भाजपालाच मत

तसेच या निकलाचा आगामी लोकसभा निवडणुकीवर काहीही परिणाम पडणार नाही, असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. “आम्ही येथील जनतेशी युती करू आणि भाजपाशी एकटे लढू. ज्यांना भाजपाला पराभूत करायचे आहे, ते आम्हाला मतदान करतील. जे काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्षाला मत देतील त्यांचे मत भाजपालाच असेल,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

तृणमूल काँग्रेसपुढे आव्हान

दरम्यान, सागरदिघी मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हा मतदार काँग्रेसच्या बाजूने गेल्यामुळे तृणमूल काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीला तोंड देण्यासाठी तृणमूल काय खरबदारी घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.