पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथील भूसंपादन विरोधी आंदोलनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं आहे. “सीपीआयने(एम) बळजबरीनं जमीन संपादन केली होती. ही जमीन रतन टाटांच्या ‘नॅनो’ प्रकल्पासाठी अनिच्छूक असलेल्या मालकांकडे मी परत केली” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. टाटांना पश्चिन बंगालमधून बाहेरचा रस्ता सीपीआयने दाखवल्याचा दावाही बॅनर्जी यांनी केला आहे. २०११ मध्ये भूसंपादन विरोधी आंदोलनाच्या जोरावर ममता बॅनर्जींनी डाव्या पक्षाला सत्तेतून खेचून तृणमुल काँग्रेसचे सरकार स्थापन केले होते.

२०२४ च्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी मैदानात, जाहीर केला निर्धार; म्हणाल्या “मी, नितीश कुमार आणि…”

Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Anti-Corruption Bureau arrests bribe-taking Deputy Director of Agriculture Commissionerate
पुणे : कृषी आयुक्तालयातील लाचखोर उपसंचालकाला पकडले
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”

“मी टाटांना राज्यातून बाहेरचा रस्ता दाखवला असे काही जण निरर्थक बोलत आहेत. सध्या टाटा रोजगार निर्मिती करत आहेत. त्याकाळी सीपीआयने बळजबरीनं जमिनीवर हक्क सांगितला होता. ती जागा मूळ मालकांना आम्ही परत केली. आम्ही कोणत्याही उद्योगपतींसोबत भेदभाव करत नाही”, असे बॅनर्जी म्हणाल्या आहेत. सिलिगुडीतील ‘बिजाया सम्मीलानी’ या कार्यक्रमात बोलताना टाटांच्या प्रकल्पाबाबत ममता बॅनर्जींनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, सीपीआयच्या(एम) केंद्रीय समितीचे सदस्य सुजान चक्रबोर्ती यांनी बॅनर्जींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.”ममता बॅनर्जी यांना काहीही ऐकायचं नसतं. टाटांनी सिंगूरमध्ये कारखाना बांधू नये यासाठी दुर्गापूर द्रुतगती मार्ग बंद करण्यात आला होता”, असा प्रत्यारोप चक्रबोर्ती यांनी केला आहे.

“…म्हणून राहुल गांधी आणि रावणामध्ये साम्य”, ‘भारत जोडो’ यात्रेवरुन अनिल बोडेंचं टीकास्र, म्हणाले, “नाना पटोलेंना अजून…”

“बंगालच्या तरुणांसाठी कारखाने आणि हॉटेल्स बांधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या आहेत. त्याचबरोबर राज्याला पर्यटन स्थळ बनवायचे आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. “राज्यात जागेचा तुटवडा नसताना बळजबरीनं जमीन का घ्यावी? आम्ही कितीतरी प्रकल्प राबवले आहेत. मात्र कुठेही बळजबरीनं जमीन संपादन केली नाही. त्यामुळे बंगालमध्ये असलेल्या उद्योगपतींनी राज्यात गुंतवणूक करावी”, असे आवाहन बॅनर्जी यांनी केले आहे.

शाळेतून घराकडे निघालेल्या तीन मुलांवर वाटेतच काळाची झडप; मातीच्या ढिगाऱ्याखील दबून मृत्यू

२००६ मध्ये डाव्या पक्षाचे सरकार तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आले होते. त्याचवेळी टाटा समुहाने सिंगूरमध्ये ‘नॅनो’ कारचा कारखाना उभारण्याची घोषणा केली होती. या कारखान्याला विरोध दर्शवत ममता बॅनर्जींनी मोठे आंदोलन छेडले होते. ऑक्टोबर २००८ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी सिंगूरमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यानंतर गुजरातच्या साणंदमध्ये हा कारखाना उभारण्यात आला.

Story img Loader