आज पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनवर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ममता बॅनर्जी यांचं नाराजी नाट्य बघायला मिळालं. भाजपा कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘जय श्री राम’च्या घोषणांमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराज होत व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात अधिकाऱ्यांसाठी असलेल्या खुर्चीवर बसणे पसंद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – आईच्या अंत्यसंस्कारानंतर तासाभरातच पंतप्रधान मोदींची कामाला सुरुवात

पश्चिम बंगालमध्ये आज वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडले. आईच्या निधनामुळे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्यामाध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याठिकाणी दाखल झाल्या. मात्र, भाजपा समर्थकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी उपस्थित केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांना विनंती केली. मात्र, त्यांनी व्यासपीठावर जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

हेही वाचा – बिहार सरकारचा नवीन विमान, हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्ताव; भाजपा म्हणाली, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी…”

दरम्यान, पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ममता बॅनर्जी शांत झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधानावर शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदीजी आज आपल्यासाठी अत्यंत दुख:द दिवस आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की हे दु:ख सहन करण्याची तुम्हाला शक्ती लाभो. तुमच्या मातोश्री म्हणजे आमच्याही मातोश्री देव तुम्हाला तुमचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे बळ देवो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – सत्ताकारण: “जे तुम्हाला मत देतात त्यांच्यासाठी काम कराच पण…” नितीन गडकरींनी सांगितली लोकशाहीची व्याख्या

पुढे बोलताना त्यांनी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू झाल्याबाबत केंद्र सरकारचे आभार मानले. आज ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवत आहेत, याचा आनंद आहे. तसेच मी रेल्वेमंत्री असताना सुरू झालेला आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जोका ते तरातळा हा रेल्वेमार्ग सुद्धा सुरू होत आहे. यासाठी मी सर्व पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री, लोकसप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal cm mamata banerjee upset at howrah station after chanting jay shri ram slogan by bjp worker spb
Show comments