लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमधील एकूणच चित्र वेगळे होते. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसला डाव्या पक्षांना सोबत घेऊन भाजपा आणि तृणमूल काँग्रेस अशा दोघांविरोधात लढावे लागले. खरे तर राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा विचार करता या सगळ्याच विरोधी पक्षांना एकजुटीने ‘इंडिया’ आघाडीच्या नावावर भाजपाविरोधात लढणे आवश्यक होते. मात्र, तसे घडताना दिसले नाही. आता निवडणूक पार पडली आहे, मात्र पश्चिम बंगालमधील काँग्रेस पक्ष कोंडीत सापडला आहे असे दिसते आहे. एकीकडे भाजपाला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतील (AICC) वरिष्ठ नेतृत्व संसदेत तसेच बाहेरही आपल्यासोबत एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला डाव्यांबरोबर पश्चिम बंगालमध्ये युती कायम ठेवणेही काँग्रेसला जड जात आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून डावे पक्ष तृणमूल काँग्रेसविरोधात राजकारण करत आले आहेत. अशा परिस्थितीत नेमकी कोणती राजकीय भूमिका घ्यावी, याबाबतची दुहेरी अडचण काँग्रेसची झाली आहे.

हेही वाचा : हंगामी अध्यक्ष पदाच्या निवडीवरुन विरोधकांना आक्षेप का? संसदीय संकेत अव्हेरण्यात आलेत का?

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

गुरुवारी (२० जून) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. दीर्घकाळ चाललेल्या या बैठकीत दोन्हीही पक्षांच्या नेत्यांनी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. आगामी संसदेच्या अधिवेशनामध्ये देशातील या दोन्हीही मोठ्या विरोधी पक्षांनी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला कशाप्रकारे कोंडीत पकडले पाहिजे, या संदर्भातील रणनीतीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकमेकांचे विरोधक असले तरीही राष्ट्रीय पातळीवर ते इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत. मात्र, पश्चिम बंगाल राज्यातील राजकारण आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारण या दोन्हींमधील त्रांगडे सध्याच्या गोंधळाचे कारण ठरले आहे. शुक्रवारी (२१ जून) बंगाल काँग्रेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांच्या साथीने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि २०२१ ची विधानसभेची निवडणूक या दोन्हींशी तुलना करता या लोकसभा निवडणुकीमधील काँग्रेसचा मतटक्का किंचित वधारला असला तरीही खासदारांची संख्या दोनवरून एकवर घसरली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोन्हीही पक्षांविरोधात निवडणूक लढवावी, असे मत बैठकीला उपस्थित असलेल्या बहुसंख्य काँग्रेस नेत्यांचे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय, डाव्यांसोबतच्या आघाडीमुळे मतटक्का थोडाफार वाढत असला तरीही दीर्घकाळच्या राजकारणाचा विचार करता त्यांच्याबरोबर युती करणे फायद्याचे ठरणार नाही, असेही मत व्यक्त करण्यात आले. एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने म्हटले की, “माकपविरोधात लढायला हवे असे आम्ही म्हणत नाही; मात्र माकप अथवा डाव्या पक्षांबरोबर युती करणे टाळायला हवे. दीर्घकाळचा विचार करता हे काँग्रेसच्या फायद्याचे ठरणार नाही. आपण हे समजून घेतले पाहिजे की राज्यात डाव्यांच्या तब्बल ३४ वर्षांच्या सत्तेमुळे आता मोठ्या प्रमाणावर लोक त्यांना स्वीकारण्यास तयार होत नाहीत. मग त्यांच्या ३४ वर्षांचे ओझे आपण का वागवावे? यामुळे आपणच दुखावले जात आहोत.”

हेही वाचा : दोन मुख्यमंत्र्यांची अशीही ‘घराणेशाही’ !

मात्र, दुसरीकडे पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे (WBPCC) अंतरिम अध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि इतरही सगळेच काँग्रेस नेते या मुद्द्याबाबत सार्वजनिकपणे भाष्य करणे टाळताना दिसत आहेत. अधीर रंजन चौधरी हे मागील लोकसभेमध्ये पक्षनेते होते. मात्र, या निवडणुकीमध्ये बहरामपूर मतदारसंघामधून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तृणमूल काँग्रेसचा उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणने त्यांचा पराभव केला आहे. या पराभवानंतर चौधरी यांचे पक्षातील स्थानही कमकुवत झाले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्यातील मंत्री फिरहाद हकीम यांनी म्हटले की, “आम्हीदेखील कधीकाळी काँग्रेसमध्येच होतो आणि डाव्यांविरुद्ध लढत होतो. काँग्रेस पक्ष राज्यातील आपली ताकद गमावून बसला, कारण त्या काळात माकपच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसपेक्षा ममता बॅनर्जींच्या नेतृत्वावर लोकांचा अधिक विश्वास होता. आता त्यांनी माकपसोबत युती केली असल्याने बंगालमधील लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास नष्ट झाला आहे. त्यांना लोकांचा विश्वास परत मिळवायचा असेल, तर ममता बॅनर्जींबरोबर विनाअट येणे हाच पर्याय आहे. या एकाच मार्गाने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस स्वत:ची ताकद वाढवू शकतो.” दुसऱ्या बाजूला माकपचे नेते सुजन चक्रवर्ती यांनी म्हटले की, “काँग्रेसचे राज्यातील आणि केंद्रातील नेते याबाबतचा निर्णय घेतील. आम्हाला याबाबत काहीही बोलायचे नाही.” भाजपा नेते समिक भट्टाचार्य यांनी म्हटले की, “पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस हा ‘साईनबोर्ड पार्टी’ झाला आहे, त्याला इथे काहीही भविष्य नाही.”