लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमधील एकूणच चित्र वेगळे होते. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसला डाव्या पक्षांना सोबत घेऊन भाजपा आणि तृणमूल काँग्रेस अशा दोघांविरोधात लढावे लागले. खरे तर राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा विचार करता या सगळ्याच विरोधी पक्षांना एकजुटीने ‘इंडिया’ आघाडीच्या नावावर भाजपाविरोधात लढणे आवश्यक होते. मात्र, तसे घडताना दिसले नाही. आता निवडणूक पार पडली आहे, मात्र पश्चिम बंगालमधील काँग्रेस पक्ष कोंडीत सापडला आहे असे दिसते आहे. एकीकडे भाजपाला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतील (AICC) वरिष्ठ नेतृत्व संसदेत तसेच बाहेरही आपल्यासोबत एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला डाव्यांबरोबर पश्चिम बंगालमध्ये युती कायम ठेवणेही काँग्रेसला जड जात आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून डावे पक्ष तृणमूल काँग्रेसविरोधात राजकारण करत आले आहेत. अशा परिस्थितीत नेमकी कोणती राजकीय भूमिका घ्यावी, याबाबतची दुहेरी अडचण काँग्रेसची झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा