आगामी वर्षात देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी देशातील सर्वच प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांकडून आघाडीच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र या आघाडीसाठी सध्यातरी अनुकूल नाहीत. असे असतानाच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मोदी सरकार आणि भाजपाविरोधात आघाडी उघडली आहे. मुस्लीम बांधावांचा सण असलेल्या ईद-उल-फित्रनिमित्ताने ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांना भाजपाच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यासह त्यांनी कामानिमित्त परदेशात गेलेल्या भारतीय मुस्लिमांनाही मतदानासाठी भारतात येण्याचे आवाहन केले आहे.

मोदी सरकारकडून बंगालमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न- ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी ईद-उल-फित्रच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (२३ एप्रिल) कोलकाता येथे आयोजित केलेल्या एका नमाजला उपस्थित राहिल्या. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी तसेच मंत्री जावेद खान उपस्थित होते. या वेळी त्यांनी मुस्लीम बांधवांना संबोधित केले. मला दंगली नको आहेत. मला विभाजनवादी राजकारण करायचे नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. “इथे प्रत्येक जण शांततेत राहतो. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. पश्चिम बंगालमध्ये अशांतता निर्माण करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये अशी कारस्थाने रचली जात असतील, तर ते मी सहन करणार नाही. आम्हाला शांतता हवी आहे. आम्हाला दंगली नको आहेत. आमच्या देशाचे विभाजन व्हावे, अशी आमची इच्छा नाही. मी माझे प्राण देईन, पण लोकांना देशाचे विभाजन करू देणार नाही. आपल्याला देशद्रोही, पैशांची ताकद, केंद्रीय तपास संस्थांविरोधात, लोकांविरोधात लढावे लागेल. मी या लढाईसाठी तयार आहे. माझ्यात ही लढाई लढण्याची हिंमतही आहे,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

maharashtra vidhan sabha election 2024 devyani farande vs vasant gite nashik central assembly constituency
लक्षवेधी लढत : जातीय, धार्मिक मुद्दे निर्णायक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
navi Mumbai Narendra modi
महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?
Amit Shah On Rahul Gandhi
Amit Shah : “इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी आता कलम ३७०…”, अमित शाह यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : राज्यातल्या निवडणुका कोणत्या मुद्यांभोवती फिरत आहेत?
Shahajibapu Patil
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “बिन कामाचा रे बिन कामाचा, अडीच वर्ष…”, शहाजी बापू पाटील यांनी केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री

हेही वाचा >> १२ तासांची शिफ्ट, आठवड्याला ३ दिवसांची सुट्टी; तामिळनाडूच्या विधेयकावर टीका झाल्यानंतर कामगार संघटनांशी चर्चा

…तर लोकशाही संपुष्टात येईल- ममता बॅनर्जी

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील शिबपूर आणि हुगळी जिल्ह्यातील रिश्रा येथे जातीय दंगली झाल्या. या दंगली भाजपामुळेच झाल्या, असा दावा ममता बॅनर्जी यांनी या वेळी केला. “काही लोक भाजपाकडून पैसे घेतात आणि आम्ही मुस्लिमांच्या मतांचे विभाजन करू, असे सांगतात. मात्र असे करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. साधारण एका वर्षानंतर लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार हे निश्चित केले जाईल. त्यामुळे विभाजनवादी शक्तींविरोधात लढण्याचा आपण संकल्प करू या. आपण सर्वांनी आगामी निवडणुकीसाठी मतदान करायला हवे. आपण लोकशाहीचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलो तर सर्व काही संपुष्टात येईल,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

तृणमूल, भाजपाकडून ध्रुवीकरणाचे राजकारण

मुस्लिमांना उद्देशून केलेल्या या भाषणानंतर भाजपा तसेच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. “ममता बॅनर्जी द्वेषाचे राजकारण करत आहेत. याचे उत्तर लोक लोकशाहीच्या माध्यमातून देतील,” असे भाजपाचे नेते शमिक भट्टाचार्य म्हणाले. तर, “भाजपा आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष देशात ध्रुवीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालची ही संस्कृती नाही. भाजपाच्या पश्चिम बंगालमधील प्रवेशाला ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा जातीयवादी संघटनेसारख्या ‘जमाती’शी हातमिळवणी करून त्या राजकारण करत आहेत. आपल्याला हा लढा लोकांना सोबत घेऊन लोकशाहीच्या मार्गाने लढावा लागणार आहे,” अशी प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते एम.डी. सेलीम यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >> Karnataka Polls : बसवराज बोम्मई यांना बंजारा समाजाचे आव्हान; गर्भाशय काढून टाकण्याचे प्रकरण काय आहे?

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आम्ही बॅकफुटवर

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी केलेल्या या भाषणाचे तृणमूलच्या नेत्यांनी समर्थन केले आहे. “मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. याच कारणामुळे तृणमूल काँग्रेस पक्षाचे समर्थन घटले आहे. त्याचा परिणाम सागरदिघी या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दिसून आला. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने युती केल्यामुळे या जागेवर आमचा पराभव झाला. हावडा आणि हुगळी येथील जातीय दंगलीनंतर ममता बॅनर्जी भाजपाविरोधात आक्रमकपणे प्रचार करत आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक मतदारांमध्ये तृणमूलबाबत पुन्हा एकदा विश्वास निर्माण होत आहे,” असे तृणमूलचे वरिष्ठ नेते म्हणाले आहेत.