Clash Between West Bengal And Odisha Government Over Tigress : गेल्या आठवड्यात झारखंड वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालपासून अंदाजे २० किलोमीटर अंतरावर एक वाघीण आढळली होती. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या वाघीणीला भटकी वाघीण म्हटले होते. तसेच या वाघीणीला पकडण्यासाठी ओडिशा सरकारने सहकार्य केले नसल्याचेही बॅनर्जी यांनी म्हटले होते. यानंतर, “३०० किमीचा प्रवास केलेली झीनत ही भटकी वाघिणी अजिबात नाही”, असे म्हणत ओडिशा सरकारने टीकेला उत्तर दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ममता बॅनर्जींची टीका

या वाघीणीच्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “बंगालच्या पाच जिल्ह्यांमध्ये झीनतने (वाघीण) दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. लोक घराबाहेर पडू शकत नव्हते, शाळा बंद कराव्या लागल्या. आता ते म्हणतात, वाघीण परत द्या. जर तुमच्याकडे जागा नसेल तर आम्हाला कळवा, आम्ही वाघीण कायमची आमच्याकडे ठेवू.”

ओडिशा सरकारचे प्रत्युत्तर

या प्रकरणावर ओडिशाचे वन आणि पर्यावरण मंत्री गणेश राम सिंहखुंटिया द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, “ममता बॅनर्जी अपरिपक्व आहेत. ओडिशामध्ये भाजपा सत्तेत असल्याने त्यांचा राग राजकीय असल्याचे आहे. ओडिशात पुरेसे जंगल नाही, हे विधान त्यांचे अज्ञान दर्शवते. कारण आमच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ३९ टक्के भागात जंगल आहे.”

गणेश राम सिंहखुंटिया यांनी पुढे सांगितले की, “ओडिशाच्या जनुकीय क्षेत्रात विविधता आणण्यासाठी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून झीनतला (वाघीण) ओडिशात आणण्यात आले होते. त्यानंतर झीनतला सिमलीपालच्या उत्तर भागात सोडण्यात आले. जिथून ती पहिल्यांदा झारखंडमध्ये आली होती.

“प्राण्यांना भौगोलिक सीमा माहित आहेत का? आपण भौगोलिक सीमांनुसार प्राण्यांना कसे बंदिस्त करू शकतो? बंगालमधील हत्ती ओडिशात येत असतात त्याचा आम्ही कधी मुद्दा बनवला आहे का? वन्य प्राणी त्यांना हवे तिथे जाण्यास मोकळे आहेत”, असेही सिंहखुंटिया म्हणाले.

या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतरही झीनतला पकडण्यात पश्चिम बंगाल प्रशासनाने केलेल्या सहाकार्याबद्दल वन मंत्री सिंहखुंटिया यांनी त्यांचे कौतुक केले.

का संतापल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी?

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल प्रशासनाला नाराज करणारी आणि ममता यांना संतप्त प्रतिक्रिया द्यायला लावणारी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने पश्चिम बंगालला पाठवलेले पत्र. या पत्रात झीनतला पकडल्यानंतर सिमिलीपालला (ओडिशा) स्थलांतरित करण्याऐवजी अलीपूर प्राणीसंग्रहालयात का हलवण्यात आले? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचबरोबर ओडिशा प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी बंगाल प्रशासनाला वाघिणीला ताबडतोब सिमिलीपालला परत पाठविण्यास सांगितले होते.

हे ही वाचा : ‘आमच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न’, दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघातील मतदार भाजपाला दूर ठेवणार?

“ओडिशाने जे केले ते बरोबर आहे. प्राण्यांना भौगोलिक सीमा माहित नसतात. आम्ही झीनतला परत आणण्यासाठी प्रयत्न केले कारण तिला एनटीसीएच्या देखरेखीखाली एका विशेष उद्देशाने (जीनपूलमध्ये विविधता आणण्यासाठी) सिमलीपाल येथे आणले होते. बंगाल प्रशासनाने ती त्यांची मालमत्ता असल्यासारखे वागायला नको होते,” असे नाव न छापण्याच्या अटीवर वन अधिकाऱ्याने सांगितले.