आगामी पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पायाभरणी केली जात आहे. पंचायत निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मोहिमेत ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी अग्रस्थानी आहेत. त्यांनी ‘जन संजोग यात्रे’चे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते दोन महिन्यांत एकूण ३५०० किमी प्रवास करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढील महिन्यात पंचायत निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता

या यात्रेच्या माध्यमातून अभिषेक बॅनर्जी पश्चिम बंगालमधील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. तसेच तृणमूलच्या अनेक नेत्यांची सध्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. असे असताना पुढील महिन्यात पंचायत निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे अभिषेक बॅनर्जी यांच्या या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा >> Karnataka Election : कर्नाटकातील अर्ध्याहून अधिक जागांवर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षाही जास्त!

कोणता उमेदवार द्यायचा हे लोकांनाच विचारणार

या यात्रेची सुरुवात उत्तर पश्चिम बंगालच्या कुचबिहारपासून झाली असून सांगता दक्षिणेतील काकद्वीप येथे होणार आहे. या यात्रेदरम्यान तृणमूल काँग्रेस लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवत आहे. आगामी पंचायत निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणता उमेदवार हवा आहे, असे या मतदानाच्या माध्यमातून तृणमूलच्या कार्यकर्त्यांना विचारले जात आहे. मात्र या प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ उडत आहे. कुचबिहार येथील गोसानिमारी येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गटांमध्ये वाद झाला. जलपायगुरी जिल्ह्यातही अशाच काही घटनांची नोंद झाली आहे.

अभिषेक बॅनर्जी २५० पेक्षा जास्त सभा घेणार

अभिषेक बॅनर्जी या यात्रेद्वारे २५० पेक्षा जास्त सभा घेणार आहेत. शनिवारी अभिषेक बॅनर्जी यांनी जटिलेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. साधारण १ वाजता ते या मंदिरात गेले. मात्र अभिषेक बॅनर्जी यांना पाहण्यासाठी येथील लोकांनी सकाळी ८ वाजल्यापासूनच गर्दी केली होती. जटिलेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर बॅनर्जी यांचे तेथील स्थानिकांनी स्वागत केले. तसेच येथे बॅनर्जी यांनी पद्मश्री पुरस्काराप्राप्त मंगला कांता रॉय यांचा सत्कार केला. त्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी भोतेपाट्टी रुग्णालयाच्या मैदानावर एका सभेला संबोधित केले. येथे त्यांनी भाजपावर टीका केली. “मनरेगा योजनेची अंमलबजावणी प्रभाविपणे करण्यात आली नाही. याच कारणामुळे साधारण २० लाख लोक बेरोजगार आहेत. मी हा मुद्दा घेऊन आमच्या पक्षांच्या खासदारांसोबत दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांकडे गेलो होतो. मात्र त्यांची आणि आमची भेट झाली नाही,” असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

हेही वाचा >> “पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांसमोर रडतात,” प्रियंका गांधींच्या आरोपानंतर काँग्रेसकडून CryPMPayCM मोहीम सुरू

ज्यांनी पक्षासाठी काम केले, त्यांनाच तिकीट मिळणार- अभिषेक बॅनर्जी

ज्या लोकांनी आतापर्यंत पक्षासाठी काम केलेले आहे, त्यांनाच पंचायत निवडणुकीत तिकीट मिळणार आहे, असेही यावेळी अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी मतदान करावे, असे आवाहन केले. अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या मतदानाच्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी गोंधळ उडत आहे. फुलबारी भागातील पहारपूर गावातील मतदानादरम्यान असाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

अभिषेक बॅनर्जी यांच्याकडून भाजपावर टीका

आपल्या या यात्रेदरम्यान अभिषेक बॅनर्जी भाजपावर सडकून टीका करताना दिसत आहेत. एका सभेला संबोधित करताना “जलपाईगुरी येथील ८० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आहे. मात्र आम्ही नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रमाणे भेदभाव करत नाहीत. मोदी सरकारने त्यांच्याकडे राज्याची थकित असलेली रक्कम अद्याप दिलेली नाही,” असा आरोप अभिषेक मुखर्जी यांनी केला. भाजपाचा विभाजनवादाच्या राजकारणावर विश्वास आहे. मात्र भाजपाचा वेगळ्या राज्याचा अजेंडा यशस्वी होणार नाही, असेही अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

हेही वाचा >> विदर्भात महाविकास आघाडीला बळ तर सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली, बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कौल

दोन दिवस तरी रस्त्यावर उतरून लोकांच्या अडचणी समजून घ्याव्यात- अभिषेक बॅनर्जी

अभिषेक बॅनर्जी यांनी भोतेपट्टी येथे एका सभेला संबोधित करताना मागील आठवड्यात झालेल्या उत्तर दिनाजपूर येथील हिंसाचाराचाही उल्लेख केला. “भाजपाने काहीतरी काम करायला हवे. त्यांना कोणतेही काम नसल्याचे त्यांच्या वागणुकीवरून दिसते. आम्ही लोकांशी संवाद साधत आहोत. त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. काही लोकांकडे स्वत:चे घर नाही. तर काही लोकांना चांगले रस्ते हवे आहेत. काही लोकांना पाणी हवे आहे. भाजपाने माझ्यासारखो ६० दिवस नव्हे, तर कमीत कमी दोन ते तीन दिवस रस्त्यावर उतरून लोकांच्या अडचणी समजून घ्याव्यात,” असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.