एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे. येथे सर्वच पक्षांकडून कसून प्रचार केला जात आहे. मात्र दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथे तृणमूलला झालदा नगरपालिका गमवावी लागली आहे. अविश्वास प्रस्ताव जिंकून या नगरपालिकेवर काँग्रेसने झेंडा फडकवला आहे.
हेही वाचा >>> Gujarat Election 2022 : गुजरातच्या आदिवासी भागांवर भाजपचा भर; विनोद तावडे यांच्याही सभा
पश्चिम बंगालमधील जालदा नागरपालिकेत तृणमूल काँग्रेसच्या हातातून गेली आहे. सध्या झालदा नगपालिकेत काँग्रेसचे पाच, तृणमूल काँग्रेसचे पाच तर २ अपक्ष नगरेसवक आहेत. मात्र अविश्वास प्रस्तावादरम्यान तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर दोन्ही अपक्ष नगरसेवकांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मत दिले. परिणामी अविश्वास प्रस्तावात पराभूत झाल्याने तृणमूलला ही नगरपालिका गमवावी लागली आहे.
हेही वाचा >>> Gujarat Election 2022: गुजरातमध्ये सात अब्जाधीश निवडणुकीच्या रिंगणात, भाजपाच्या पाच उमेदवारांचा समावेश
आठ महिन्यांपूर्वी येथे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. यावेळी तृणमूलने दोन अपक्ष नगरसेकांच्या मदतीने झालदा नगरपालिकेवर सत्ता स्थापन केली होती. मात्र आता आठ महिन्यानंतर याच दोन गरसेवकांनी काँग्रेसची साथ दिल्यामुळे तृणमूलला ही सत्ता गमवावी लागली आहे.
या पराभवानंतर तृणमूलचे पुरूलिया जिल्ह्याचे अध्यक्ष सौमेन बेल्थोरिया यांनी झालदा येथील स्थानिक नेतृत्वाकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. तर या विजयामुळे विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस, भाजपा तसेच सीपीआय (एम) या पक्षांमध्ये उत्साह संचारला आहे. आगामी मार्च-एप्रिल २०२३ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी हे पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत.