West Bengal vs Odisha on Tigers : पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शेजारच्या राज्यातून होणारे जंगली श्वापदांचे हल्ल्यांच्या मुद्द्यावर नाराज आहेत. तर ओडिशाचे वन मंत्री गणेश राम सिंहखुंतीया यांनी ममता बॅनर्जी या माणसांनी बनवलेल्या सीमा वन्य प्राण्यांवर लादल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
वन्य प्राण्याची कथित मालकी आणि त्यांची राज्यांच्या किंवा देशांच्या सीमा ओलांडून होणारी येजा या मुद्द्यावर राजकीय भूमिका घेतली जाण्याचा हा पहिलाच मुद्दा नाही. दोन दशकांपूर्वी जेव्हा उत्तर बंगालमधील बक्सा व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ आढळला नाही, तेव्हा तत्कालीन डाव्या आघाडी सरकारच्या अधिकाऱ्यांनी शिकारीची सत्य दडवण्यासाठी बक्साचे वाघ मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होऊन भूतानची सीमेत गेल्याचा दावा केला होता.
बक्साला लागून आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील असलेल्या फिप्सू वन्यजीव अभयारण्यात कोणीही तपासणीला गेले नाही. तर भूतान सरकारने वाघांना आपल्या सीमेमध्ये ठेवण्यासाठी कुंपण घातलं जावं या मागणीच्या वादात पडलं नाही.
यादरम्यान आंतरराष्ट्रीय सीमेवर मात्र अशा कुंपणाची संख्या वेगाने वाढत आहेत. यापैकी बरीचशी कुंपन निर्वासितांना रोखण्यासाठी उभारली जात आहेत, तर काही प्रामुख्याने वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी आहेत. जगातील सर्वात मोठे ५ हजार ६१४ किलोमीटरचे कुंपण हे एखाद्या सीमवर उभारण्यात आलेले नाही. तर हे कुंपण ऑस्ट्रेलियामध्ये १९व्या शतकात डिंगोपासून मेंढ्यांचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आले होते.
अलीकाडच्या काळात बोत्स्वानाने झिंम्बाब्वेच्या सीमेवर ५०० किमी लांबीचे इलेक्ट्रिक तारांचे कुंपण उभारले आहे. याचा उद्देश पाय आणि तोंडाचे आजार झालेल्या गुरांना देशात येण्यापासून रोखणे हे आहेत. तसेच यामुळे हत्ती, जिराफ आणि झेब्रा यांच्या सारख्या वन्यजीवांना देखील स्थलांतर करण्यापासून रोखले जाते.
ऑस्ट्रेलियाचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून चीनने देखील त्याच्या मंगोलियाबरोबरच्या ४,७१० किमीच्या सीमेवर कुंपण उभारण्यास २००८ मध्ये सुरूवात केली. मंगोलियातून येणाऱ्या लांडग्यांपासू उत्तर चीनच्या गवताळ प्रदेशात मेंढ्यांच्या कळपांचे रक्षण करण्यासाठी हे कुंपण उभारले जात आहे.
मंगोलिया येथे लांडगे हे संस्कृतीक प्रतिक आहेत, त्यामुळे हा कुंपणाचा मुद्दा बऱ्यापैकी भावनिक बनला होता. चंगेज खानने देखील लांडग्यांच्या टोळीच्या आधारावर उभे केलेल्या सैन्यान्या अर्धे जग जिंकले होते. पण या कुपणामुळे खुलान्स या एसियाटिक जंगली गांढवांचे हंगामी स्थलांतरही थांबल्याने कोणी याहद्दल जास्त तक्रार केली नाही.
अगदी काही दिवासांपूर्वीच भारतात सीमा ओलांडून शिकार करण्यात आल्याचा मुद्दा दोन राज्यांमध्ये चर्चेत आला होता. २०१६ मध्ये नजीबाबाद उत्तर प्रदेश येथे सापडलेल्या पाच पैकी चार वाघांच्या कातडी या उत्तरांखंडमधील कॉर्बेट व्यघ्र प्रकल्पातील वाघांच्या असल्याचे आढळून आले होते.
यामुळे उत्तराखंडचे वनमंत्री एच एस रावत यांनी उत्तर प्रदेश सरकारवर कॉर्बेट अभयारण्यातील वाघांचे संरक्षण करण्यास अपयशी ठरल्याबद्दल जबाबदार धरले होते. तसेच त्यानी अभयारण्याच्या दक्षिणेकडील सीमेवर कुंपण उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण उत्तर प्रदेश पोलिसांनी उत्तराखंड पोलिसांबरोबर एकत्र येते कारवाईला सुरूवात केल्यानंतर हा प्रस्ताव सोडून देण्यात आला.
वाघ बऱ्याचदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करतात. वाघ दूरपर्यंतचा प्रवास करू शकतात. २०२३ मध्ये महाराष्ट्रातील ब्रम्हपुरीते मध्य प्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यातून २००० किमीचा प्रवास करून वाघ ओडिशाच्या रायगड जिल्ह्यात पोहचला होता. हे सरळ अंतर मोजलं तर ते ६५० किमी भरतं.
वाघांनीही नव्या जागांच्या शोधात प्रवास केल्याची उदाहरणे आहेत. २०१८ मध्ये, मध्य प्रदेशातील रतापाणी अभयारण्यातील एक वाघ ३०० किमी अंतरावर असलेल्या गुजरातमधील महिसागरपर्यंत पोहचला होता. गुजरात सरकारने २७ वर्षांनंतर झालेल्या वाघाच्या आगमनानंतर कुठलाही प्रश्न उपस्थित केला नाही. पण पुढे या वाघाचा विषबाधा झाल्यामुळे संशयास्पद मृत्यू झाल्याने सरकारवर टीका झाली होती.
हरियाणाचे वनमंत्री कंवर पाल यांनी २०१३ मध्ये उत्तराखंडच्या राजाजी व्याघ्र प्रकल्पातून राज्याच्या कालेसर राष्ट्रीय उद्यानात वाघ आल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. कलेसर परिसरात ११० वर्षांनंतर वाघ दिसल्याने हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशी पोस्ट त्यांनी वाघाचा फोटोसह फेसबुकवर शेअर केली होती.
एका वर्षानंतर राजस्थानच्या सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाने, रेवाडी जिल्ह्यातील झाबुआ राखीव जंगलात दोनदा प्रवेश केल्याबद्दल हरियाणाच्या वन अधिकाऱ्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. तर दुसर्यांदा तर हरियाणाने गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानातून पिंजरा मागवला आणि ड्रोनच्या मदतीने वाघाचा शोध घेतला. अखेर राजस्थानच्या एका पथकाने वाघाला पकडून परत नेले.
वन्य प्राणी मानसाने तयार केलेल्या सीमांचे पालन करू शकत नाहीत परंतु त्यांचे स्वत:चे मन नक्कीच आहे. २०१० मध्ये गुजरातमधून सिंह मिळण्याची वाट पाहत असलेल्या मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कने राजस्थानच्या रणथंभोर व्याघ्र प्रकल्पातून चंबळ नदी ओलांडून आलेल्या वाघाचे स्वागत केले.
पण यामुळे कुनोच्या सिंह आणि वाघांसाठी योग्य आहे की या वादाला तोंड फुटले. एका दशकानंतर २०२० मध्ये जवळजवळ सर्व जण विसरून केलेला हा वाघ रणथंभोरला परतला. त्यामुळे कुनो अभयारण्याच चित्त्यांच्या आगमनासाठी वाट मोकळी झाली.