भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) सोमवारी ॲनी राजा यांना केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे राहुल गांधी खासदार आहेत. ॲनी या सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य असून, त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. खरं तर पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांच्या त्या पत्नी आहेत. त्या नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमनच्या सरचिटणीसही आहेत आणि शालेय जीवनापासून त्या राजकारणात आहेत. पश्चिम बंगाल आणि पंजाबनंतर आता केरळमध्येही विरोधी I.N.D.I.A. आघाडीमध्ये फूट पडली आहे. इंडिया आघाडीचा प्रमुख मित्र कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) सोमवारी ४ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. यातील राहुल गांधी यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पक्षाने ॲनी राजा यांना तिकीट दिले आहे. याशिवाय तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात पनियान रवींद्रन यांना तिकीट देण्यात आले आहे. तर व्हीएस सुनील कुमार यांना त्रिशूरमधून आणि अरुण कुमार यांना मावेलिकारामधून उमेदवारी देण्यात आली आहे. ॲनी राजा यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा