संतोष प्रधान

राहुल गांधी यांच्या मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेचा आज सायंकाळी शिवाजी पार्कवरील सभेेने समारोप होत असताना, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मुंबईत राजकीय फायदा किती होईल आणि पक्षाचा घटलेला जनाधार पुन्हा प्राप्त होईल का, याचीच उत्तरे पक्षाच्या नेत्यांना शोधावी लागतील.

shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
maharashtra assembly election 2024 rahul gandhi criticized pm modi at campaign rally
पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त

काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये मुंबई शहरातच झाली. याच मुंबईत काँग्रेसची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. मित्र पक्ष शिवसेना ठाकरे गट फक्त दोन जागा देण्यास तयार आहे. पक्षात प्रचंड मरगळ आली आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी हे पक्षाचे दोन माजी मंत्री निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षात दाखल झाले. आणखी काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या काही माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गट किंवा भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश केला. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड हा पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असले तरी अन्य नेत्यांची तेवढी साथ त्यांना मिळत नाही. मुंबईत काँग्रेसचा असलेला दबदबा नाहीसा झाला आहे.

हेही वाचा >>>आगामी लोकसभा निवडणुकीत ‘या’ १० राज्यांवर सगळ्यांचे लक्ष, कोण मारणार बाजी?

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटही गांभीर्याने घेण्यास तयार नाही. उत्तर पश्चिम या अंधेरी ते गोरेगाव पसरलेल्या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असताना या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्पर अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली. उत्तर मुंबईत यशाची अपेक्षा नसताना हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसच्या गळ्यात मारत आहेत. उत्तर मध्यमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेता हा मतदारसंघ मिळावा अशी काँग्रेसची मागणी आहे. याशिवाय दादर, धारावी ते वडाळ्यापर्यंत पसरलेल्या दक्षिण मध्य मुंबईवर काँग्रेसने दावा केला असला तरी हा मतदारसंघ शिवसेना सोडण्यास तयार नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत शरद पवार यांनी डोळे वटारल्यावर दिल्लीतील काँग्रेस नेतृत्व जागावाटपात नमते घेत असत. शिवसेनेतील आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क वाढवून मुंबईत काँग्रेसचे खच्चीकरण सुरू केल्याची प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसमधील एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. जागावाटपात मुंबईत सारे शिवसेनेच्या कलाने चालले असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांची झाली आहे.

हेही वाचा >>>राज्यातील पाच टप्प्यांतील निवडणुकीचा महायुतीला प्रचारासाठी अधिक लाभ?

मुंबईत काँग्रेसला उत्तर भारतीय, दलित, अल्पसंख्याक, झोपडपट्टीवासीयांचा चांगला पाठिंबा मिळत असे. यामुळेच काँग्रेसला यशही मिळत असे. पण २०१४ पासून उत्तर भारतीय मतदार भाजपकडे वळला. झोपडपट्टीवासीयही काँग्रेसपासून दुरावले. त्याचा साहजिकच परिणाम पक्षाच्या मतपेढीवर झाला. समाजातील सर्व घटकांना जोडून मुंबईत पक्ष वाढविणे गरजेेचे आहे. पण मुंबई काँग्रेसमधील गटबाजी कमालीची टोकाला गेली असल्याने नेतेमंडळींच परस्परांचे पाय खेचण्यातच अधिक समाधान मानतात. दलित समाजाचा पाठिंबा मिळावा या उद्देशानेच चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. त्याचा मुंबईत पक्षाला फायदा घेता येऊ शकतो. पण हंडोरेच फारसे फिरत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे.

मुंबईत राहुल गांधी यांच्या यात्रेच्या निमित्ताने वातावरणनिर्मिती करण्यात आली असली तरी त्याचा राजकीय फायदा उठविण्याचे आव्हान नेतेमंडळींसमोर असेल. मुंबईत पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळणार हे अद्यापही स्पष्ट नाही. २००४ आणि २००९ मध्ये मुंबई काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. २०१४ पासून मुंबईत पक्षाची पाटी कोरी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा हात देणार का, याचीच उत्सुकता आहे.