वसंत मुंडे

भाजप प्रदेश बैठकीसाठी नाशिक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सचिव पंकजा मुंडे एकाच गाडीतून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सार्वजनिक पातळीवर काही महिन्यांपासून विशेषतः बीड जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर कार्यक्रमापासून पंकजा अलिप्त राहिल्या. ‘मला आयत्या कार्यक्रमांना जायची गरज नाही, पक्षाचा राजशिष्टाचार पाळणारी कार्यकर्ती आहे.,’ अशा शब्दात टोला लगावत नाराज नसल्याचा खुलासा पंकजा मुंडे केला होता. त्यामुळे फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वादाचा धुराळा उडाला. पंकजा समर्थकांनी समाजमाध्यमातून फडणवीस यांना लक्ष्य केल्याने सार्वजनिक पातळीवरील दोघांमधील विसंवाद ठळकपणे माध्यमातून उमटला. पण पक्षाच्या बैठकीला दोन्ही नेते एकाच गाडीतून गेल्याने दोघांच्या नेमक्या खर्‍या भूमिका कोणत्या, यावरुन कार्यकर्ते संभ्र्रमात पडले आहेत.

wardha Aam Aadmi Party which helped Amar Kale win taken candidate wise stance now
आघाडीस धक्का! ‘ आप ‘चा दोन ठिकाणी आघाडीस तर दोन ठिकाणी अपक्षास पाठिंबा.
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
BJP office bearers in Maval asserted their position to campaign for Bapu Bhegde of NCP Ajit Pawar party Pune news
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? विरोधकांनी त्यांच्या बदलीची मागणी का केली होती?
Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
Ratan Tata Successful businessman with social consciousness
रतन टाटा : सामाजिक जाणीव राखणारा यशस्वी उद्योगपती
dgp Rashmi Shukla
रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांकडून का होतेय? झारखंड पोलीस महासंचालकांचा संदर्भ काय?
congress mallikarjun kharge on ups
‘पंतप्रधान मोदींचा हलक्या दर्जाचा प्रसिद्धीचा प्रयत्न’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका; ‘एक्स’वरील पोस्टवरून दोघांमध्ये उडाले खटके

महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारणीची दोन दिवसीय बैठक नाशिक येथे नुतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र, या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सचिव पंकजा मुंडे एकाच गाडीतून आल्याने त्यांच्या एकत्र प्रवासाच्या बातमीने लक्ष वेधले. वैयक्तिक पातळीवर संवाद असताना सार्वजनिक पातळीवरचा विसंवाद यामुळे कार्यकर्ते गांगरले आहेत.

हेही वाचा… वर्ध्यात राष्ट्रवादीमध्ये नव्या-जुन्यांमधील वादाचा पक्षाला फटका

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे पक्षातुनच विरोधकांना रसद पुरवल्याचा आरोप करत पराभवाचे खापर अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या माथी फोडले. तेंव्हापासून पंकजा समर्थकांनी समाजमाध्यमातून फडणवीस यांना लक्ष्य केले. दरम्यान विधानपरिषदेवर अपेक्षा असतानाही पंकजा यांच्याऐवजी ऐनवेळी रमेश कराड यांना तर केंद्रात डॉ. प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी डॉ.भागवत कराड यांना पक्षाने मंत्रीपदाची संधी दिली. पंकजा समर्थकांनी राजीनामे देऊन नाराजी व्यक्त केली. तेंव्हापासून पंकजा आणि फडणवीस यांच्यातील वाद धुमसत असल्याचे अनेक जाहीर कार्यक्रमातून समोर आले. पंकजा यांना राष्ट्रीय सचिव करुन मध्यप्रदेशच्या सहप्रभारीची जबाबदारी सोपवत राज्याच्या राजकारणातून दूर केल्याचीच भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे.

हेही वाचा… गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजप आमदाराचा दारुण पराभव

राज्यभर गर्दी खेचणार्‍या भाजपातील एकमेव नेत्या पंकजा असतानाही मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण होत असल्याचे उघडपणे समाजमाध्यमातूनही कार्यकर्तेही व्यक्त होतात. या पार्श्‍वभूमीवर मागील दोन महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी थेट बीडमध्ये येऊन दिवंगत विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला हजेरी लावली. तर गहिनीनाथ गडावरील पुण्यतिथी कार्यक्रमालाही फडणवीस आवर्जून आले. जिल्ह्यातील या दोन्ही कार्यक्रमांना मुंडे भगिनी गैरहजर होत्या. मुंबईतही तर्पणच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री एकत्र आले होते. त्यामुळे फडणवीस आणि पंकजा यांच्यातील राजकीय वाद ठळकपणे दिसत असला तरी दोघांनीही आमच्यामध्ये कोणताही वाद नाही असे स्पष्टीकरण देत अप्रत्यक्षपणे एकमेकांना शह देण्याचाच प्रयत्न केला. फडणवीसांच्या दौर्‍यापासून अलिप्त असलेल्या पंकजा यांनी नंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याबरोबर जिल्ह्यात प्रचार सभेला हजेरी लावली. मी पक्षाचा ‘प्रोटोकॉल’ पाळणारी कार्यकर्ती आहे, असे त्या आवर्जून सांगत आहेत. फडणवीस यांनीही पंकजा या नेत्या आहेत. राष्ट्रवादीने कितीही प्रलोभने दाखवली तरी त्या पक्ष सोडणार नाहीत असा दावा केला होता. त्यामुळे दोघातील सार्वजनिक विसंवाद माध्यमांमध्ये अनेकदा ठळकपणे समोर आला होता. सार्वजनिक पातळीवर कुरघोड्या आणि व्यक्तिगत संवादाच्या भेटीची परळीमध्ये उलटसुलट चर्चा आहे.