काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केरळमधील वायनाडमधून, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून तर छत्तीसगडचे माजी गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांना महासमुंदनमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
त्याशिवाय पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस राजस्थानमधून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य सचिन पायलट यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. एकंदरीतच काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांमध्ये आपल्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी देण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत याच हिंदी भाषक राज्यांत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा – सुधा मूर्ती राज्यसभेत; राजकारणापल्याडच्या माणसांची राज्यसभेवर कशी होते निवड? काय असतात निकष?
महत्त्वाचे म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावरून वरिष्ठ नेत्यांनीही आता लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार राहावे, असा संदेश देण्याचा प्रयत्नच काँग्रेसने केला आहे. के. सी. वेणुगोपाल केरळमधील अलप्पुझा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी यापूर्वीदेखील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
विशेष म्हणजे वेणुगोपाल यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण- वेणुगोपाल हे राजस्थानमधून राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचा जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे. अशा वेळी जर त्यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला, तर त्यांना राज्यसभेची जागा खाली करावी लागेल आणि राजस्थानमध्ये राज्यसभेची पोटनिवडणूक होईल. त्या निवडणुकीत भाजपाला सहज विजय मिळवता येईल.
त्याशिवाय राहुल गांधी हे पुन्हा केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढविणार आहेत. मात्र, गेल्या वेळेप्रमाणे ते अमेठीतूनही निवडणूक लढवतील का? याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव केला होता.
रायबरेलीतून प्रियंका गांधी या निवडणूक लढवतील, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होती. मात्र, या जागेबाबत अद्यापही काँग्रेसने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रायबरेलीच्या जागेबाबतही अस्पष्टता आहे. २००४ पासून काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च रोजी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत काँग्रेसच्या १८ विद्यमान खासदारांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादीत दक्षिणेकडील राज्यांवर भर देण्यात आला आहे. जाहीर झालेल्या ३९ उमेदवारांपैकी २८ उमेदवार हे दक्षिणेकडील राज्यांमधील आहेत. त्यामध्ये केरळमधील १६, कर्नाटकातील सात, तेलंगणातील चार व केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपमधील एका जागेचा समावेश आहे. दक्षिणेकडील दोन राज्यांत सध्या काँग्रेसची सत्ता आहे.
जातीय समीकरणांचा विचार केला, तर ३९ पैकी १५ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील असून, २४ उमेदवार हे अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास व अल्पसंख्याक प्रवर्गातील आहेत. तर, १२ उमेदवार हे ५० पेक्षा कमी वयाचे आहेत. तसेच ७१-७७ वयोगटातील सात उमेदवारांचा समावेश आहे.
एकंदरीत काँग्रेसच्या पहिल्या यादीचा विचार केला, तर यात कोणताही धक्कादायक निर्णय घेतला गेल्याचे दिसत नाही. केरळच्या त्रिशूर मतदारसंघाचे खासदार टीएन प्रतापन वगळता काँग्रेसने सर्व विद्यमान खासदारांना कायम ठेवले आहे. या जागेसाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचे पुत्र व वडाकार मतदारसंघाचे विद्यमान खासदार के. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची थेट लढत भाजपाचे उमेदवार अभिनेते सुरेश गोपी यांच्याशी होईल. तर, वडाकार मतदारसंघातून तरुण आमदार शफी पारंबिल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा – ओवैसींविरोधात प्रथमच हिंदुत्ववादी महिला निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत भाजपाच्या माधवी लता?
कर्नाटकचा विचार केला, तर कर्नाटकमध्ये काँग्रेसने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे भाऊ व विद्यमान खासदार डी. के. सुरेश यांना पुन्हा एकदा बंगळुरू ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने माजी मुख्यमंत्री ए.स बंगारप्पा यांची मुलगी गीता शिवराजकुमार यांना शिमोगामधून उमेदवारी दिली आहे. गीता शिवराजकुमार यांनी गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिमोगा येथून जेडी(एस)चे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती; मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
हसनमध्ये काँग्रेसने एम. श्रेयस पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय विजापूरमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एच. आर. अल्गुर, हावेरीमधून आनंदस्वामी गड्डादेवमठ, तुमकूरमधून एस. पी. मुद्दाहनुमगौडा व मांड्यामधून वेंकटरामगौडा यांना उमेवदारी देण्यात आली आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसने कोरबा मतदारसंघातून विद्यमान खासदार ज्योत्स्ना महंत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर, माजी राज्यमंत्री शिवकुमार दहरिया यांना जांगीर-चांपा आणि रायपूर मतदारसंघातून विकास उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तेलंगणामधील जहिराबादमधून काँग्रेसने माजी खासदार सुरेश कुमार शेटकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, माजी केंद्रीय मंत्री बलराम नाईक पोरीका यांना महबूबाबाद, चल्ला वामशी चंद रेड्डी यांना मेहबूबनगर व रघुवीर कुंडुरू यांना नालगोंडा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने लक्षद्वीपमधून माजी खासदार मोहम्मद हमदुल्ला सईद यांना उमेदवारी दिली आहे. तसेच शिलाँगमधून खासदार व्हिन्सेंट पाला आणि तुरा मतदारसंघातून माजी आमदार सालेंग ए.संगमा यांना उमेदवारी दिली आहे. तर, गोपाल छेत्री यांना सिक्कीममधून उमेदवारी देण्यात आली आहे.