सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

औरंगाबाद : गर्दीचा जसा रंग असतो तसे गर्दीचा म्हणून एक उत्साहदेखिल असतो. जाहीर सभांमध्ये तो दिसतो. औरंगाबाद येथे आयोजित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभेच्या गर्दीचा रंग चेहरा पांढराफट्ट पडावा असा होता. कदाचित पाठिमागे असणाऱ्या रिकाम्या पांढऱ्या खुर्च्यांसारखा ! फारशा घोषणा नाही की ढोल- ताशे नाही., ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ या दोन चार वेळा नेत्यांनी द्यायला लावलेल्या घोषणांशिवाय भाजपच्या सभेतील निरुत्साही गर्दीसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांची उजळणी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेच्या दोन वाक्यांपलिकडे फारसा प्रभाव दिसून आला नाही. भाजपने कधीही न लढविलेल्या लोकसभा मतदारसंघातील प्रतिसादावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे असे वातावरण भाजपचे राष्ट्रीय जे. पी.नड्डा यांच्या सभेत दिसून आले. या वेळी देशातील मोफत करोना लसीकरण हा मुद्दा भाजपने राजकीय व्यासपीठावर चर्चेत आणला.

हेही वाचा… चंद्राबाबूंची लोकप्रियता एवढी वाढली ?

जे. पी. नड्डा यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच बरेच कार्यकर्ते सभा सोडून निघून जात असल्याचेही चित्र दिसून आले. औरंगाबाद जिल्ह्यातील लोकसभा लढविताना पक्षाची भूमिका मांडणारे प्रभावी वक्ते नाहीत, असा भाजपच्या चमूने केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ठळकपणे दिसतील असे सभेतील भाषणांचे उतरंड होती. सभेच्या आयोजनात पुढाकार घेतलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना बोलण्यासाठी केवळ दोन मिनिटे मिळाली. त्यात त्यांनी करत असलेल्या विकास कामांची उजळणी वाचून दाखवली. अपघाताने झालेले खासदार अशी टीका त्यांनी एमआयएमचे खासदार इत्मियाज जलील यांच्यावर केली. पंकजा मुंडे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. रावसाहेब दानवे यांच्यामध्ये सभा गाजविण्याची हातोटी आहे. पण राष्ट्रीय अध्यक्षांसमोर काही एक वावगे होऊ नये म्हणून त्यांनीही भाषण आटोपतेच घेतले. त्यामुळे सभेचा सारा नूर जे.पी. नड्डा यांच्या भाषणाने बदलेल अशी रचना होती. त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांमुळे झालेले परिवर्तन आणि विकास यावर भाषणातील बहुतांश वेळ खर्च केला. त्यात लसीकरणामुळे देश कसा सुरक्षित राहिला. अन्य देशाच्या तुलनेत भारत किती सशक्त आहे हे सांगितले. लोकसभा निवडणुकीस आणखी सव्वा वर्षाचा कालावधी असताना योजनांमुळे झालेला विकास या मुद्दयांभोवती त्यांनी त्यांचे भाषण केले. केवळ सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी भाजपचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. हाच आरोप चंद्रपूरच्याही सभेत केला होता. त्यामुळे तो आरोप कार्यकर्त्यांना आधीच माहीत होता. त्यामुळे गर्दी जमवून दंडातील बेटकुळी दाखविण्याचा उद्योग कशासाठी असा शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेला साजेशी सभा असेच त्याचे वर्णन सार्थ ठरेल असेच वातावरण सभे दरम्यान होते.

हेही वाचा… कोल्हापूरमध्ये पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांमधील संघर्षाला नव्याने धग

भाजप अल्पसंख्याक विरोधी नसल्याचे दोन संदेश

चंद्रपूर येथे बेहबतुल्ला शाह बाबा यांच्या दर्गा येथे जाऊन चादर अर्पण केली. तसेच औरंगाबाद येथील सभेतील सुरुवातीचे भाषण हज समितीचे सदस्य एजाज देशमुख यांनी केले. त्यानंतर ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस आणि अनुसुचित मोर्चाचे जालंदर शेंडगे यांनाही भाषणाची आवर्जून संधी देण्यात आली.