राजेश्वर ठाकरे

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा नेण्यासाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. या आंदोलनामागे मोर्चेकरी संघटनांना त्यांचे कार्यक्रम घेण्यास भाजप प्रणित हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारने आणलेल्या आठकाठीचा आक्रोश हे प्रमुख कारण असल्याचे समजते.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
Executive Trustee of Bharatiya Unit Trust and apex body of mutual funds A P Kurian
बाजारातली माणसं : फंड उद्योगाचा पायाचा दगड, ए. पी. कुरियन
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?
balrangbhumi sammelan pune
पहिले बालरंगभूमी संमेलन पुण्यात, संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची निवड

भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांनी ६ ऑक्टोबरला म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूर येथे लाखोंचा जनसमुदाय येतो. यामुळेच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती व न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. तरीही गुरुवारी (६ ऑक्टोबर) दलित बहुल उत्तर नागपुरात मोठ्या संख्येने नागरिक संघ मुख्यालयाकडे कूच करण्यासाठी रस्त्यावर आले.

हेही वाचा… धनुष्यबाण तातडीने आम्हाला द्या अन्यथा तातडीने गोठवा;  शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

मोर्चासाठी संघ मुख्यालयाचीच निवड का?

मोर्चा आयोजक संघटनांनी हरियाणा येथे २७ जून २०२२ ला डीएनए परिषदेचे तर बामसेफ व राष्ट्रीय मूल निवासी संघाने २१ ऑगस्ट २०२२ रोजी उत्तर प्रदेशात राज्य अधिवेशन आयोजित केले होते. पण तेथील भाजप प्रणित सरकारने ते होऊ दिले नाही. एवढेच नव्हेतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, असा आरोप आहे. या घटनांमागे संघाची विचारसरणी कारणीभूत आहे. ही बाब संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकाराचे हनन करणारी आहे. त्यामुळे भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवायचा, असे नियोजन होते. यामागे धम्मचक्र प्रवर्तन दिनी होणाऱ्या गर्दीवरही आयोजकांचा डोळा होता. या माध्यमातून आपला मुद्दा रेटून नेण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता असे एकूण घडामोडींवर नजर टाकल्यास दिसून येते.

हेही वाचा… Dasara Melava 2022 : पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात फडणवीस विरोधाची तलवार म्यान

नागपूर हे दीक्षाभूमीमुळे परिवर्तनाची भूमी म्हणून तर संघ मुख्यालयामुळे उजव्या विचारसरणीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. उजव्या विचारसरणीच्या केंद्रावर परिवर्तनवादी विचाराच्या नागरिकांनी मोर्चा काढल्याने तो राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

संघटनांची पार्श्वभूमी

आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेल्या भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा या संघटना गैरराजकीय असल्यातरी त्यांचा उगम दिवंगत बसपा नेते कांशीराम यांच्या बामसेफ या बहुजन कर्मचारी संघटनेच्या धर्तीवर झाला आहे. भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम हे पूर्वी बामसेफमध्ये होते. यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा… बंगळूरू महापालिका निवडणूक होणार का? कोणत्याच राजकीय पक्षाला नको आहे निवडणूक कारण…

“धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी देशभरातून लाखो लोक पवित्र दीक्षाभूमीवर येतात. या काळात कधीही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. मात्र, या अनुयायांचा राजकीय कारणांसाठी वापर करणे गैर आहे.” – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री

Story img Loader