विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांच्यामधील खडाजंगी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जातीय जनगणनेचा मुद्दा लावून धरणाऱ्या राहुल गांधींना तुमची जात कोणती आहे, असा प्रश्न विचारणाऱ्या अनुराग ठाकूर यांच्यावर सध्या विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी केलेले हे वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुराग ठाकूर यांच्या याच सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. त्यावरून आता विरोधक आक्रमक झाले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विशेषाधिकार वा हक्कभंग प्रस्ताव मांडण्याची नोटीस सादर केली आहे. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील भाषणादरम्यान अनुराग ठाकूर यांनी केलेली काही वक्तव्ये सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकली होती. विशेषाधिकार प्रस्ताव कोणत्याही सदस्याद्वारे मांडला जाऊ शकतो. हा प्रस्ताव अध्यक्षाद्वारे मान्य केला जाऊ शकतो. त्यानंतर अध्यक्ष हा प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे पाठवू शकतात. पंतप्रधानांच्या विरोधात आजवर कधी आणि कोणत्या वर्षी विशेषाधिकार प्रस्ताव मांडला गेला आहे, त्यावर एक नजर टाकू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा